शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - पंढरपूर पालखी मार्गावर मराठा आंदोलकांचे रस्ता रोको आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 12:39 IST

एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमचे हक्काच नाही कुणाच्या बापच, जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ हे' अशा घोषणा देत रस्त्यावर ठिय्या मांडून बसले

नीरा : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटीलांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी नीरा येथील सकल मराठा समाज नीरा पंचक्रोशीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 'एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमचे हक्काच नाही कुणाच्या बापच, जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ हे' अशा घोषणा देत रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ रस्त्यावर ठिय्या मांडून बसले होते. 

   शनिवार पासून राज्यभरात मराठा आरक्षणासाठी रास्तारोको करण्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले होते. शनिवार एच.एस.सी. बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून आंदोलन स्थगित केले होते. रविवारी सकाळी नीरा (ता.पुरंदर) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर काही काळासाठी ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आले. याकाळात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी मोठ्या संख्येने नीरा पंचक्रोशीतील पिंपरे (खुर्द), गुळूंचे, कर्नलवाडी, राख, जेऊर, मांडकी आदी गावातील मराठा बांधव उपस्थित होते. 

 मराठा आंदोलक सुरेश वीर, सचिन मोरे,  तुळशीराम जगताप, मंगेश ढमाळ, कुलदीप पवार, अजित सोनवणे, सचिन थोपटे, गणेश थोपटे आदींनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नीरेतील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलीस स्टेशन अंकित नीरा पोलिस दुरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक संदिप मोकाशी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलकांनी दहा मिनिटांनंतर पोलीसांंना आपल्या मागण्यांचे निवेदन पत्र दिले. 

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणSocialसामाजिक