मराठा मोर्चा आंदोलन सुरूच; घोडेगाव, जुन्नरला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 02:22 AM2018-07-26T02:22:25+5:302018-07-26T02:22:40+5:30

शांततेने मोर्चे काढून शासनाचा निषेध

Maratha Morcha movement begins; Ghodegaon, Junnarala road stop | मराठा मोर्चा आंदोलन सुरूच; घोडेगाव, जुन्नरला रास्ता रोको

मराठा मोर्चा आंदोलन सुरूच; घोडेगाव, जुन्नरला रास्ता रोको

Next

घोडेगाव : येथे मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये घोडेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
सकाळी १० वाजता महाराणी चौकातील शिवाजी पुतळ्याला महिलांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी मराठा समाजाच्या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर घोडेगाव बाजारपेठेतून मोर्चा काढून आहिल्यादेवी होळकर चौकात नेण्यात आला. येथे सुमारे एक तास मंचर-भीमाशंकर रस्ता रोखून धरण्यात आला. या वेळी अनेक मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. या मोर्चाला मोठ्या संख्येने मराठा व इतर समाजातील लोक उपस्थित होते. या वेळी इतर समाजाच्या लोकप्रतिनिधींनीदेखील या मोर्चाला पाठिंबा व्यक्तकेला.

शिरूरमध्ये बंदला प्रतिसाद
शिरूर : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शहरात व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत मंगळवारी बंद पाळला. शहरातील मराठा बांधवांनी शहरात फेरी मारून बंदचे आवाहन केले. यानंतर तहसीलदारांना मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदेना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली. शिंदे यांनी जलसमाधी घेतल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. शहरात कसलाही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पाळला गेला. मराठा बांधवांनी शहरात फिरुन व्यापाºयांना आवाहन केल.े याला सकारात्मक प्रतिसाद देत शहरात बंदला प्रतिसाद मिळाला.

दिवसभर लोणी काळभोर व कदमवाकवस्ती बंद
लोणी काळभोर : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला नागरिकांनी बुधवारी दिवसभर लोणी काळभोर बंद ठेवून प्रतिसाद दिला. या वेळी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत युवकांनी रॅली काढली.
या युवकांनी व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. व्यावसायिकांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आज दिवसभर लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सर्व व्यवहार बंद होते. पुणे-सोलापूर महामार्ग सुरळीतपणे सुरू होता. मराठा महासंघाच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक निवेदन देण्यात आले. लोणी काळभोर पोलिसांनी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Maratha Morcha movement begins; Ghodegaon, Junnarala road stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.