Maratha kranti morcha : अामदार कुलकर्णी यांचा निषेध करण्यासाठी पुण्यात स्टंट अांदाेलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 17:57 IST2018-08-08T17:55:06+5:302018-08-08T17:57:54+5:30
अामदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील अलका चाैकात स्टंट अांदाेलन करण्यात अाले.

Maratha kranti morcha : अामदार कुलकर्णी यांचा निषेध करण्यासाठी पुण्यात स्टंट अांदाेलन
पुणे : पुण्यातील काेथरुड विधानसभा मतदार संघाच्या अामदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यातील अलका (टिळक चाैक) चाैकात स्टंट अांदाेलन करण्यात अाले. यावेळी मेधा कुलकर्णी यांच्या निषेधार्थ घाेषणाही देण्यात अाल्या. तसेच त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात अाला.
राज्यात विवध ठिकाणी अांदाेलने केल्यानंतर मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने लाेकप्रतिनिधींच्या घरासमाेर ठिय्या अांदाेलने करण्यात येत अाहेत. मेधा कुलकर्णी यांनी एका वेब पाेर्टलशी बाेलताना या अांदाेलनांना स्टंट म्हणून संबाेधले हाेते. त्याचे तीव्र पडसाद उमटले हाेते. त्यांच्या घरासमाेरील अांदाेलनावेळी अांदाेलक अाणि त्यांच्या मुलामध्ये वाद झाले हाेते. कुलकर्णी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अाणि अांदाेलन अाणि स्टंट यातील फरक दाखविण्यासाठी मराठा क्रांती माेर्चा अाणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यातील अलका चाैकात स्टंट अांदाेलन करण्यात अाले. यावेळी दाेन बाईकर्सनी विविध स्टंट करुन दाखवले. चाैकातील एका बाजूची वाहतूक वळवून हे अांदाेलन करण्यात अाले. काळजाचा ठाेका चुकवणारे स्टंट यावेळी करण्यात अाले. हे स्टंट पाहण्यासाठी माेठी गर्दी या चाैकात झाली हाेती.
या अांदाेलनाविषयी बाेलताना मराठा क्रांती माेर्चाचे समन्वयक प्रशांत धुमाळ म्हणाले, मेधा कुलकर्णी यांनी मराठा अांदाेलनाला स्टंट म्हणून त्याची थट्टा केली हाेती. त्यामुळे अांदाेलन काय असते अाणि स्टंट काय असताे हे दाखविण्यासाठी हे अांदाेलन करण्यात अाले. असंवेदनशील लाेकप्रतिनिधी अांदाेलनाची थट्टा उडवत अाहेत. अाम्ही अामच्या मागण्यांसाठी पाेटतिडकीने अांदाेलन करत असताना त्याला स्टंट म्हणून संबाेधने याेग्य नाही.