शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा करणार 'आक्रोश आंदोलन'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 8:44 PM

शासनाने आरक्षणाबाबत मराठा समाजाची असलेली भावना समजून घेणे आवश्यक

ठळक मुद्देसरकारने जाहीर केले जुन्याच तरतुदीतील आकडे 

पुणे : घटनेप्रमाणे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण 'एसीबीसी' संरक्षित राहावे. ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणाची वस्तुस्थिती लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या लक्षात आणून देण्याकरिता चारही प्रमुख पक्षांच्या कार्यालयासमोर 'आक्रोश आंदोलन' करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. 

शासनाने मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांचे हित डोळ्यासमोर ठेवून तरतुदींमधील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकड्यांमधून जुन्याच तरतुदी दिसत असून यामध्ये केवळ मराठा नव्हे तर अन्य खुले प्रवर्गही समाविष्ठ असल्याचे दिसत असल्याचे असल्याचा आक्षेप मराठा क्रांती मोर्चापुणे जिल्ह्याच्यावतीने पत्रकार परिषदेत नोंदविण्यात आला. यावेळी राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, प्राची दुधाने, तुषार काकडे, बाळासाहेब आमराळे, हनुमंत मोटे, धनंजय जाधव आणि सचिन आडेकर आदी समन्वयक उपस्थित होते. 

यावेळी कोंढरे म्हणाले की, शासन स्तरावर सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठविण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना मोर्चाचे सहकार्य आहे. शासनाने आरक्षणाबाबत समाजाची असलेली भावना समजून घेणे आवश्यक असून त्यादृष्टीने गांभीर्याने उपाययोजना केल्या पाहिजेत. अन्यथा सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक घोषणा दिशाभूल करणार्‍या ठरू नयेत असेही कोंढरे म्हणाले. न्यायालयाचा स्थगिती आदेश येण्यापुर्वी झालेले प्रवेश व जाहीर झालेल्या नियुक्त्या संरक्षित करण्याबाबत शासनाने भुमिका स्पष्ट करावी, अशी मागणी कुंजीर यांनी केली. ----पत्रकार परिषदेतील प्रमुख मागण्या*  कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी *  मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत.

* मंत्रिमंडळ उपसमितीला वित्तीय व प्रशासकीय अधिकार देण्याबाबत शासनाची भुमिका स्पष्ट असावी. *  सारथी आणि आण्णासाहेब पाटील महामंडळाला प्रत्येकी एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजुर करावा.*  एमपीएससी परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. ------ मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने टिळक रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय, डेक्‍कन बस स्टॉपमागील शिवसेना पक्ष कार्यालय, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोरील भाजपा कार्यालय आणि काँग्रेस भवन येथे रविवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत आंदोलन करण्यात येणार आहे.  

टॅग्स :PuneपुणेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणPoliticsराजकारणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार