शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पुण्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; महावितरणची भरती प्रक्रिया पाडली बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 3:45 PM

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महावितरणच्या रास्ता पेठ मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन

पुणे : मराठा आरक्षणाच्या कारणावरून महावितरणने थांबवलेली मराठा समाजाच्या पात्र उमेदवारांची नियुक्ती त्वरित करावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महावितरणच्या रास्ता पेठ मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अर्ज पडताळणी प्रक्रिया बंद पाडली. 

पुण्यातील रास्ता पेठ येथे असलेल्या महावितरणच्या कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पात्र उमेदवार देखील हजर झाले होते. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी प्रवेशद्वारासमोर महावितरण आणि राज्य सरकारच्या निषेधार्ह घोषणाबाजी केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, अशोक चव्हाण यांनाही घोषणांमधून लक्ष्य करण्यात आले. यावेळी अर्ध्या तासाच्या आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत यांनी निवेदन स्वीकारले. मराठा मोर्चाचे मागणीपत्र पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.

काय आहे प्रकरण...? महावितरणने जुलै २०१९ मध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाच्या भरतीची जाहिरात दिली होती. त्या पदाची ऑनलाइन परीक्षा चाचणी २५ ऑगस्टला घेण्यात आली. मात्र नंतर कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर पात्र उमेदवारांची निवड यादी २८ जून २०२० ला जाहीर करण्यात आली. महावितरणने मात्र त्यावेळी भरती प्रक्रिया राबविताना मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने ही भरती प्रक्रिया राबवली होती. त्यात मराठा समाजातील ४९५ उमेदवार पात्र ठरले होते. परंतु, दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देऊन हा विषय घटनापीठाकडे सोपवला आहे. त्याचा आधार घेत महावितरणने पात्र उमेदवारांसह सर्वच भरती प्रक्रिया थांबवली आहे. लेखी परीक्षा, वैद्यकीय परीक्षा यात उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजाच्या सर्व पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी, अशी मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmahavitaranमहावितरणagitationआंदोलनState Governmentराज्य सरकारNitin Rautनितीन राऊत