शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

मराठा समाजास घटनात्मकदृष्ट्या आरक्षणाची गरज, सासवडमधील आंदोलनाचा समारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 2:12 AM

राजेंद्र कोंढरे : सासवड येथील ठिय्या आंदोलनाचा १०० व्या दिवशी समारोप, संवाद यात्रेस प्रारंभ

सासवड : ‘‘राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयातील सर्वोत्तम अनुभवी वकिलांसोबत मराठा आरक्षणाच्या सवैधानिक वस्तुनिष्ठतेवर सखोल अभ्यास करून आरक्षण घटनात्मक करण्याचे प्रयत्न करावेत. न्यायालयात आरक्षणाला आव्हान मिळाले तरी आरक्षण अबाधित राहून त्याचा लवकरात लवकर मराठा समाजास लाभ मिळावा. या सोबतच मराठा समाजाच्या इतर २२ मागण्या विनाअट मंजूर करण्यासाठी सरकारने संपूर्ण तयारी करणे गरजेचे आहे,’’ असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी सासवड येथे व्यक्त केले.

सरकार आणि विरोधकांना मराठा समाजाच्या मागण्यांची आठवण करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठा संवाद यात्रा काढण्यात येथे आहेत. १६ नोव्हेंबरपासून सासवड येथील शिवतीर्थावरून ही यात्रा सुरू झाली असून २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत विधानभवनावर धडकणार आहे. सरकारला आरक्षणाच्या निर्णयाचे व इतर मागण्या मान्य करण्यासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक होणार असल्याचे मराठा समाजाच्या वतीने हे संकेत आहेत. मराठा आरक्षणासोबतच कोपर्डी प्रकरणातीलआरोपींच्या फाशीच्या शिक्षेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तसेच वसतिगृहांचा प्रलंबित प्रश्न, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सवलतींमधील सावळागोंधळ, मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठी मराठी संवाद यात्रा असून याचा सरकारवर दबाव वाढवणार असल्याचे राज्य समन्वय समितीचे शांताराम कुंजीर यांनी सांगितले. या संवाद यात्रेला राज्य समन्वय समितीचे शांताराम कुंजीर, राजेंद्र कोंढरे, डॉ. बुधाजीराव मुळीक, रघुनाथ चित्रे, प्रशांत वांढेकर, नंदकुमार जगताप, सोनुकाका जगताप, स्नेहल काकडे, राजेंद्र जगताप, अजय सावंत, सागर जगताप, संतोष जगताप, संतोष हगवणे आदी पुरंदर तालुका समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.सासवड येथे दि. ९ आॅगस्टपासून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी शिवतीर्थावर ठिय्या आंदोलन सुरू होते. या आंदोलनास १६ नोव्हेंबर रोजी १०० दिवस पूर्ण झाले. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सकारात्मक आल्याने सासवडचे ठिय्या आंदोलनाचे संवाद यात्रेत रूपांतर होऊन त्याची सुरूवात सासवड येथून भगवा झेंडा दाखवून करण्यात आली.संवाद यात्रेच्या प्रारंभासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सासवड येथे एकवटले होते. ही संवाद यात्रा सासवड येथून निघून शुक्रवारी दुपारी जेजुरी, वाल्हे, नीरामार्गे बारामती येथे सायंकाळी मुक्कामी जाणार असून सायंकाळी बारामती येथे जाहीर सभा होणार आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPuneपुणेmarathaमराठा