शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

पुणे जिल्ह्यात ४ हजार ९०४ जागांसाठी तब्बल ११ हजार ७ उमेदवार नशीब आजमावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 16:03 IST

ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीचा ज्वर वाढणार..

ठळक मुद्दे८१ ग्रामपंचायती झाल्या बिनविरोध : ६५० ग्रामपंचायतीत होणार चुरशीच्या लढतीपुरंदरमधील पिंगोरीचा निवडणुकीवर बहिष्कारदौंड, बारामती, इंदापूर, शिरूर,खेड  मध्ये सर्वाधिक उमेदवारहायटेक प्रचारावर राहणार भर

पुणे : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. ४ हजार ९०४ जागांसाठी ११ हजार ७ उमेदवार रिंगणात आहेत. ८१ जागा बिनविरोध झाल्या असून ६५० जागांसाठी चुरशीच्या लढती होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीचा ज्वर वाढणार आहे. ४ तारखेला अर्ज माघारीच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. डिसेंबर अखेर मुदत संपलेल्या 746 ग्रामपंचायतिचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक जाहीर केला होता. जवळपास २१ हजार ३५८ उमेदवारांनी २१ हजार ७७१ अर्ज दाखल केले होते.  यातील ८ हजार ७७८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे 650 ग्रामपाच्यातीच्या निवडणूक 15 तारखेला होणार आहे. यात 2 हजार 31 प्रभागात 4 हजार 904 जागांसाठी 11 हजार 7 उमेदवार रिगणात उभे आहेत. माळेगाव ग्रामपंचायत येत्या काही दिवसात नगरपालिका होणार असल्याने सर्व उमेदवारांनी एकत्र येत निवडणूक खर्च टाळण्यासाठी अर्ज मागे घेतल्याने येथील निवडणूक होणार नाही.  15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली आहे. प्रचारासाठी  आता केवळ 9 दिवस उरले आहे. यामुळे मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होणार आहे. अनेक ग्रामपंचायतीत गटातटाच्या राजकारनामुळे चुरस पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होणार असल्याने गाव करभाऱ्याचा निवडीचा फड यंदा चांगलाच रंगणार आहे. ------हायटेक प्रचारावर राहणार भरग्रामपाच्यातीतीही यंदा हायटेक प्रचारावर उमेदवाराचा भर राहणार आहे. फेसबुक, व्हाट्स अँप, इन्स्टाग्राम या सारख्या समाज माध्यमांवर यापूर्वीपासूमच उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. या सोबतच आपली कामे मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी आधुनिक माध्यमाचा वापरही उमेद्वारांतर्फे केला जाणार आहे. ----दौंड, बारामती, इंदापूर, शिरूर,खेड  मध्ये सर्वाधिक उमेदवार शिरूर तालुक्यात 1148, दौंड तालुक्यात 1172, बारामती 1013, खेड मध्ये 1111तर इंदापूर तालुक्यात सर्वाधिक 1355 उमेदवार निवडणूक रिगणात आहेत. 

.... पुरंदरमधील पिंगोरीचा निवडणुकीवर बहिष्कारगावात विकासकामे होत नसल्याच्या कारणावरून  बिनवोरोधाच्या वाटचालीवर असलेल्या पिंगोरी ग्रामपाच्यातीच्या सर्व सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. या निवडणुकीत बहिष्कार घालणारी एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. गावातील दोन महत्त्वाच्या रस्त्याची कामे आमदार खासदारांनी आश्वासने देऊनही पूर्ण केली नाहीत. तसेच गाव अनेक सुविधांपासून वंचित असल्याने ग्रामस्थांनी अर्ज माघारीच्या दिवशी ग्रामपाच्यात निवाडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कर घातला.

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना