शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Manorama Khedkar: फरार मनोरमा खेडकरची अटकेतून तात्पुरती सुटका, अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:22 IST

Manorama Khedkar News: पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा ट्रकचालक अपहरण प्रकरणात शोध सुरू होता. मनोरमा खेडकरने अटकेच्या भीतीमुळे न्यायालयात धाव घेतली होती. 

Manorama Khedkar Latest News: ट्रकमधील व्यक्तीचं अपहरण करून घरात डांबून ठेवणाऱ्या मनोरमा खेडकरला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मनोरमा खेडकर अपहरण प्रकरणापासून फरार आहे. तिने बेलापूर सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मनोरमा खेडकरला १३ ऑक्टोपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुढील सुनावणीत यावर अंतिम निकाल दिला जाणार आहे. 

१३ सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये मिक्सर ट्रकचा मनोरमा खेडकर यांच्या लॅण्ड क्रूझर गाडीला धक्का बसला होता. या अपघातानंतर खेडकरने ट्रकमधील प्रल्हाद चौहान याला जबरदस्ती कारमध्ये बसवले. 

मनोरमा खेडकर त्याला व्यक्तीला पुण्यातील बावधन येथील बंगल्यावर घेऊन गेली. तिथे त्याला डांबून ठेवले होते. रबाळे पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार आली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मनोरमा खेडकरच्या घरातून पोलिसांनी प्रल्हाद चौहानला सोडवले. 

मनोरमा खेडकर, पती आणि अंगरक्षकासह फरार

पोलिसांनी अपहरण प्रकरणा मनोरमा खेडकरला नोटीस बजावली होती. पण, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. पोलिसांनी चौकशीसाठी बोलवल्यानंतर मनोरमा खेडकर, तिचा पती दिलीप खेडकर आणि त्यांचा सुरक्षा रक्षक फरार झाले. त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीसही काढण्यात आली होती. 

दरम्यान, मनोरमा खेडकरने बेलापूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. मंगळवारी न्यायालयाने मनोरमा खेडकरला अंतरिम जामीन मंजूर केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Manorama Khedkar gets temporary bail in abduction case.

Web Summary : Manorama Khedkar, wanted in an abduction case, received temporary relief. The court granted her interim anticipatory bail until October 13th, pending the final hearing. She allegedly kidnapped a truck driver after a road accident and held him captive. Khedkar, along with her husband and bodyguard, had been absconding.
टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरPune Crimeपुणे क्राईम बातम्याNavi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस