शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सर रुग्णाच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील मनोहरमामा भोसलेला साताऱ्यात घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 18:12 IST

उर्वरीत विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओंकार शिंदे हे दोघे आरोपी फरारी आहेत. फरारी आरोपींना देखील लवकरच अटक करण्यात येणार

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेसह बारामती तालुका पोलिसांची कामगिरी

बारामती : कॅन्सर झालेल्या रुग्णास कॅ न्सर बरा करतो, असे सांगून बारामती शहरातील एकाची २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणात  फरार असलेल्या मनोहर उर्फ मामा भोसलेला पुणे ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील लोणंद गावच्या हद्दीत ताब्यात घेतले आहे. लवकरच अटक केली जाणार आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशीकांत खरात (रा.साठेनगर, कसबा बारामती ता बारामती जि पुणे) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तक्रारदार खरात यांचे वडीलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहरमामा भोसले भोंदुबाबाच्या मौजे मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला.

तक्रारदार यांच्या वडीलांचा गळयावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असे सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिले. तसेच विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगनमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून एकुण २,५१,५००/- रुपये त्यांचे व त्यांचे वडीलांचे जिवाचे बरे वाईट होईल अशी भिती घालून देण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली आहे. पैसे परत मागीतल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहे.

त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचा कसून तपास सुरु होता. आज आरोपी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगांव ता. करमाळा जि.सोलापुर)यास ताब्यात घेण्यात यश आले आहे. त्याला बारामती तालुका पोलीस ठाण्यात आणत अटक केली जाणार आहे. उर्वरीत विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा , ओंकार शिंदे हे दोघे आरोपी फरारी आहेत. फरारी आरोपींना देखील लवकरच अटक करण्यात येईल, त्यांच्या मागावर पोलीस पथके असल्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले.

फार्महाऊस मधून घेतले ताब्यात

मनोहर मामा भोसले यास साताऱ्यात ताब्यात घेतल्याप्रकरणी अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले कि, मनोहर मामा भोसले यास सातारा फलटण रस्त्यावरील सालपे गावी ताब्यात घेण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास भोसले यास सालपे गावातील एका फार्महाऊसवर अटक करण्यात आली आहे. तो या फार्म हाऊसमध्ये लपून बसला होता. हे फार्महाऊस त्याच्या मालकीचे आहे का? त्या ते अन्य कोणाचे आहे.फार्महाऊस अन्य कोणाचे असल्यास त्याला कोणी आसरा दिला होता का, याबाबत पोलीस कसून शोध घेत असल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीsatara-acसातारा