मंजुलज्योतीजी म. सा. यांनी दिला शांतीचा संदेश; चंदननगर जैन स्थानकात ‘महामांगलिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 13:33 IST2018-01-02T13:30:30+5:302018-01-02T13:33:29+5:30

उपप्रवर्तीनी प. पू. मंजुलज्योतीजी म. सा. आदी ठाणा यांच्या सान्निध्यात चंदननगर जैन स्थानकात नवीन वर्षानिमित्त पाच महामांगलिकचे आयोजन श्री संघांच्या वतीने करण्यात आले होते.

Manjuljyoti gave Message of Peace; 'Mahamangalik' at Chandan nagar Jain sthanak | मंजुलज्योतीजी म. सा. यांनी दिला शांतीचा संदेश; चंदननगर जैन स्थानकात ‘महामांगलिक’

मंजुलज्योतीजी म. सा. यांनी दिला शांतीचा संदेश; चंदननगर जैन स्थानकात ‘महामांगलिक’

ठळक मुद्देमंजुलज्योतीजी म. सा. यांनी शांतीने जगा व प्रत्येकाला शांतीने जगू द्या, दिला संदेशचंदननगर संघाचे पदाधिकारी प. पू. म. सा. यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतील : राजेंद्र कर्नावट

बिबवेवाडी : उपप्रवर्तीनी प. पू. मंजुलज्योतीजी म. सा. आदी ठाणा यांच्या सान्निध्यात चंदननगर जैन स्थानकात नवीन वर्षानिमित्त पाच महामांगलिकचे आयोजन श्री संघांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी प. पू. मंजुलज्योतीजी म. सा. यांनी शांतीने जगा व प्रत्येकाला शांतीने जगू द्या, असा संदेश दिला. त्यांनी सांगितले, की भगवान महावीरांनी सांगितलेला अहिंसेचा मार्गच जगाला शांतीकडे नेऊ शकतो. प्रत्येकाने संयम पाळण्यास शिकणे आवश्यक आहे. 
यावेळी संघाचे अध्यक्ष राजेंद्र कर्नावट, रसिकलाल बोरा, शांतीलाल बोरा, राजेंद्र मुथ्था यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष राजेंद्र कर्नावट यांनी सांगितले, की प. पू. म. सा. यांच्या सान्निध्यामुळे व मार्गदर्शनामुळे आम्हाला नवीन वर्षात जगण्याची नवीन दिशा प्राप्त झाली आहे. चंदननगर संघाचे सर्वपदाधिकारी व कार्यकर्ते प. पू. म. सा. यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतील.

Web Title: Manjuljyoti gave Message of Peace; 'Mahamangalik' at Chandan nagar Jain sthanak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.