‘जागतिक शांती केंद्रा’साठी मुंबईत जमीन देणार मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 03:55 AM2017-10-09T03:55:25+5:302017-10-09T03:55:38+5:30

मांगी तुंगी येथे भगवान वृषभदेव यांच्या १०८ फूट विशाल मूर्तीची स्थापना, तसेच तेथील विकासासाठी शासनाने सहकार्य केले आहे. या कामाच्या दुस-या टप्प्यासाठीही सरकार मदत करेल.

 Chief Minister assured to give land in Mumbai for 'World Peace Center' | ‘जागतिक शांती केंद्रा’साठी मुंबईत जमीन देणार मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

‘जागतिक शांती केंद्रा’साठी मुंबईत जमीन देणार मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

googlenewsNext

मुंबई : मांगी तुंगी येथे भगवान वृषभदेव यांच्या १०८ फूट विशाल मूर्तीची स्थापना, तसेच तेथील विकासासाठी शासनाने सहकार्य केले आहे. या कामाच्या दुस-या टप्प्यासाठीही सरकार मदत करेल. जैन समाजाच्या प्रस्तावित जागतिक शांती केंद्रासाठी मुंबईत जागा निश्चित करून, ती या केंद्राकरिता देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
गोरेगाव येथे श्री ज्ञानमती माताजी यांच्या ६६व्या त्याग दिवस आणि ८४व्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मांगी तुंगी येथील भगवान वृषभदेव यांच्या विशाल मूर्तीमुळे देशाला जागतिक कीर्ती मिळाली असून, याचे सारे श्रेय श्री ज्ञानमती माताजींचे आहे.
माताजींनी समाजासाठी मोठा त्याग केला. चारशे ग्रंथांची निर्मिती केली. त्यांच्या या ग्रंथामुळे आपल्या जीवनाचे सार्थक होण्यास मदत होते. जैन समाजाने जगाला नेहमीच दातृत्वाची कृतिशील शिकवण दिली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘वृषभदेव चरित्र’ या हिंदी अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या महोत्सवास आमदार मंगल प्रभात लोढा, राज पुरोहित, राजेंद्र पाटनी, तसेच रवींद्र कीर्ती स्वामी, आर. के. जैन, संजय बोरा, सुरेश जैन, मूर्ती समितीचे अनिल जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title:  Chief Minister assured to give land in Mumbai for 'World Peace Center'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.