मांजाने हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापला; तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 10:14 IST2023-01-24T10:14:40+5:302023-01-24T10:14:50+5:30

नायलॉन मांजाने काही दिवसांपूर्वीच २ पोलीस आणि १ अग्निशमन दलाचा कर्मचारी जखमी झाले होते

Manja slashed the hotelier's throat; Immediate admission to the hospital saved his life | मांजाने हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापला; तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला

मांजाने हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापला; तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला

पुणे : दुचाकीवरून जात असताना रस्त्यात आलेल्या पतंगाच्या मांजाने एका हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापला गेला. श्रीकांत लिपाणे (वय २७) असे यात जखमी झालेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना वारजे येथील ढोणेवाडाजवळ रविवारी दुपारी साडेचार वाजता घडली.

याप्रकरणी निखिल गोपीनाथ लिपाणे (वय २९, रा. जांभूळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक माहितीनुसार, श्रीकांत लिपाणे हे आईला घेऊन दुचाकीवरून पुनावळे येथून जांभूळवाडीकडे सर्व्हिस रोडने जात होते. ढोणेवाडाजवळ रस्त्यावर अर्धवट लटकलेल्या पंतगाच्या मांजाने त्यांचा गळा कापला. लोकांनी तातडीने त्यांना माई मंगेशकर रुग्णालयात दाखल केल्याने माेठा अनर्थ टळला. आता त्यांची प्रकृती सुधारत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बागवे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. पोलिस हवालदार राजगुरू तपास करीत आहेत. पतंगाच्या मांजाने काही दिवसांपूर्वीच धनकवडी येथे दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले हाेते. मार्केटयार्डमध्ये अग्निशमन दलाचा कर्मचारीही जखमी झाला हाेता.

Web Title: Manja slashed the hotelier's throat; Immediate admission to the hospital saved his life