शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली पुण्यातील मंडई आणि तुळशीबाग झाली सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 1:55 PM

नियमांचे उल्लंघन झाल्यास परवाना होणार रद्द

ठळक मुद्देनियमांचे पालन करत खरेदीसाठी नागरिकांचे प्राधान्य  

पुणे : कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली तुळशीबाग आणि मंडई शुक्रवारी सुरु करण्यात आली. त्यामुळे पुणेकरांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. तुळशीबाग व मंडई सुरु करण्यास परवानगी दिली गेली असली तरी कोरोनाचा शहरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फिजिकल डिस्टंन्सिंगसह सरकार व महापालिका प्रशासनाच्या आदेश व नियमांचे पालन करणे दुकानदार व नागरिकांना बंधनकारक असणार आहे. 

 केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊनमधून दिलासा देत महापालिकेने आणखी एक निर्णय घेतला असून महात्मा फुले मंडई आणि तुळशीबाग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शुक्रवारपासून मंडईमधील २०० गाळे आणि तुळशीबागेतील दुकाने सुरू झाली आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानांचे परवाने रद्द केले जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली. महात्मा फुले मंडईमधील २०० गाळे धारकांनी महापालिकेकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यांना प्रशासनाने फिजिकल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करणे, सॅनिटायझेशन आदी नियमांचे पालन करण्याच्या अटी घालून परवानगी दिली आहे. सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी पट्टे आखून देण्यात आले आहेत.

 ज्यांनी परवानगी घेतलेली नाही अशा उर्वरित गाळे धारकांनी व्यवसाय सुरू केल्यास कारवाई केली जाणार आहे. त्यांनी परवानगी मागितल्यास त्यावर काय निर्णय घ्यायचा यावर अद्याप विचार करण्यात आलेला नाही. मंडई मधील गाळे सुरू होणार असल्याने पुणेकरांना तसेच मध्यवस्तीतील नागरिकांना ताजी भाजी आणि फळे खरेदी करता येणार आहेत. ------/------ तुळशीबागेमध्ये २०० पथारीधारक, ३५० दुकाने आहेत. तुळशीबागेमध्ये एक दिवसाआड यातील निम्मी-निम्मी दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या व्यावसायिकांना वार ठरवून देण्यात आले असून एकाआड एक दिवस दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आठवड्यातील सातही दिवस तुळशीबाग उघडी असणार आहे. दोन दुकानांमध्ये पाच मिटरचे अंतर राखण्यात येणार आहे. फक्त २० टक्के फेरीवाल्यांना परवानगी देण्यात आली आहे.  

टॅग्स :PuneपुणेtulsibaugतुळशीबागCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका