लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली पुण्यातील मंडई आणि तुळशीबाग झाली सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 01:55 PM2020-06-05T13:55:12+5:302020-06-05T13:56:14+5:30

नियमांचे उल्लंघन झाल्यास परवाना होणार रद्द

Mandai and Tulshibagh are started which have been closed for the last two months due to lockdown | लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली पुण्यातील मंडई आणि तुळशीबाग झाली सुरू 

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली पुण्यातील मंडई आणि तुळशीबाग झाली सुरू 

Next
ठळक मुद्देनियमांचे पालन करत खरेदीसाठी नागरिकांचे प्राधान्य  

पुणे : कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली तुळशीबाग आणि मंडई शुक्रवारी सुरु करण्यात आली. त्यामुळे पुणेकरांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. तुळशीबाग व मंडई सुरु करण्यास परवानगी दिली गेली असली तरी कोरोनाचा शहरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फिजिकल डिस्टंन्सिंगसह सरकार व महापालिका प्रशासनाच्या आदेश व नियमांचे पालन करणे दुकानदार व नागरिकांना बंधनकारक असणार आहे. 

 केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊनमधून दिलासा देत महापालिकेने आणखी एक निर्णय घेतला असून महात्मा फुले मंडई आणि तुळशीबाग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शुक्रवारपासून मंडईमधील २०० गाळे आणि तुळशीबागेतील दुकाने सुरू झाली आहेत.
 नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानांचे परवाने रद्द केले जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली. महात्मा फुले मंडईमधील २०० गाळे धारकांनी महापालिकेकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यांना प्रशासनाने फिजिकल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करणे, सॅनिटायझेशन आदी नियमांचे पालन करण्याच्या अटी घालून परवानगी दिली आहे. सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी पट्टे आखून देण्यात आले आहेत.


 ज्यांनी परवानगी घेतलेली नाही अशा उर्वरित गाळे धारकांनी व्यवसाय सुरू केल्यास कारवाई केली जाणार आहे. त्यांनी परवानगी मागितल्यास त्यावर काय निर्णय घ्यायचा यावर अद्याप विचार करण्यात आलेला नाही. मंडई मधील गाळे सुरू होणार असल्याने पुणेकरांना तसेच मध्यवस्तीतील नागरिकांना ताजी भाजी आणि फळे खरेदी करता येणार आहेत. 
------/------ 
तुळशीबागेमध्ये २०० पथारीधारक, ३५० दुकाने आहेत. तुळशीबागेमध्ये एक दिवसाआड यातील निम्मी-निम्मी दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या व्यावसायिकांना वार ठरवून देण्यात आले असून एकाआड एक दिवस दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आठवड्यातील सातही दिवस तुळशीबाग उघडी असणार आहे. दोन दुकानांमध्ये पाच मिटरचे अंतर राखण्यात येणार आहे. फक्त २० टक्के फेरीवाल्यांना परवानगी देण्यात आली आहे.  

Web Title: Mandai and Tulshibagh are started which have been closed for the last two months due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.