पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीबाबत पुण्यात एक पत्रकार परिषद पार पडली होती. त्या पत्रकार परिषदेत मानाच्या गणपतीनंतर अखिल मंडई मंडळ आणि त्यानंतर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ हे विसर्जन मिरवणूकीत सहभागी होतील असं सांगितलं गेलं होत. आणि त्यानंतर कुठंतरी पुण्यात जे अनेक वर्ष शंभर वर्षापेक्षा जास्त जुनी मंडळी आहेत. त्या मंडळामध्ये कुठंतरी नाराजी पसरली. आमच्याकडे कुठंतरी दुर्लक्ष होतंय असा त्यांचा सूर आहे. त्यांनी मनाच्या गणपती अगोदर आम्ही निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून मंडळांमध्ये वाद सुरु झाले होते. मात्र अखेर या वादाला आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, मंडई गणेश मंडळांचे १ पाऊल मागे घेतले आहे. पूर्वीपासुन असलेल्या परंपरेनुसारच ही दोन्ही मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात आज बैठक पार पडली. या बैठकीला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचे विश्वस्त पुनीत बालन आणि अखिल मंडई गणेश मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात उपस्थित होते. पोलिसआयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर या दोघांनाही सहकार्य करण्याची तयारी दाखवली. यापूर्वी भाऊ रंगारी आणि मंडई गणेश मंडळानी मानाच्या पाच गणपतीनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीचा मुद्दा तापला होता.