व्यवस्थापन कोट्याचा गोंधळ

By Admin | Updated: June 22, 2016 01:14 IST2016-06-22T01:14:37+5:302016-06-22T01:14:37+5:30

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, व्यवस्थापन, इन हाऊस व अल्पसंख्याक कोट्यातील

Management quota | व्यवस्थापन कोट्याचा गोंधळ

व्यवस्थापन कोट्याचा गोंधळ

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, व्यवस्थापन, इन हाऊस व अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशप्रक्रियेत महाविद्यालयांनी व शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज जमा करून एका महाविद्यालयाने आपल्या जागा अचानक सरेंडर केल्या आहेत; त्यामुळे अनेक विद्यार्थी या कोट्यातील प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.
व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशप्रक्रिया राबविण्याचे सर्वाधिकार संबंधित महाविद्यालयाच्या प्रशासनाला आहेत. मात्र, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने व अकरावी केंद्रीय नियंत्रण समितीने महाविद्यालयांना व्यवस्थापन, इन हाऊस व अल्पसंख्याक कोट्यातील जागा सरेंडर करण्यासाठी ८ ते १८ जून हा कालावधी दिला होता. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांनी याच कालावधीत आपला व्यवस्थापन कोटा सरेंडर करणे अपेक्षित होते. मात्र, सेंट मीराज् कॉलेजने आपल्या व्यवस्थापन कोट्यातील जागा मंगळवारी (दि. २१) सरेंडर करीत असल्याचे पत्र दिले. तसेच, कोट्यांतर्गत पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश संपल्यानंतर म्हणजेच २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोट्याच्या उर्वरित जागा सरेंडर करता येणार आहेत, असे ८ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, सेंट मीराज् कॉलेजने विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारून एकही प्रवेश फेरी न घेता आपल्याकडील सर्व जागा अचानक सरेंडर केल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Management quota