शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय मराठी शाळा काढण्याचा मानस : कराड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 2:57 AM

जागतिक स्तरावर २१ फेबु्रवारी हा दिन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

पुणे : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त भविष्यात जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय मराठी शाळा काढण्याचा आमचा मानस आहे. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी ज्याप्रमाणे केंब्रिज आणि आयबीसारख्या अनेक संस्था जागतिक स्तरावर कार्य करीत आहेत, त्याच धर्तीवर दर्जेदार मराठी भाषा शिकविण्याचे कार्य करण्याची माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

जागतिक स्तरावर २१ फेबु्रवारी हा दिन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत राज्यभाषा सल्लागार समितीच्या सदस्या स्वाती राजे, लेखिका ऊर्मिला विश्वनाथ कराड, संस्कृतचे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, मंदा उदय नाईक, गायक सलील कुलकर्णी उपस्थित होते.कराड म्हणाले की, मातृभाषेतच प्रत्येक व्यक्तीची मानसिक प्रगती होत असते. त्यांचा भावनात्मक विकाससुद्धा उत्तम प्रकारे होतो. परंतु आज इंग्रजी ही प्रतिष्ठेची भाषा बनली आहे. त्या माध्यमातून उत्तम रोजगार मिळतो. परंतु आता दोन पावले पाठीमागे जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी शाळा काढण्याची आमच्यावर वेळ आली आहे. राज्यात शिक्षण संस्थांचे मोठे जाळे आहे. त्यांच्या आधारे मराठी शाळा काढाव्या. मराठी बाणा घेऊन कार्य करणारे लोक, तसेच शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. सलील कुलकर्णी म्हणाले, की दोन मराठी माणसेसुद्धा इंग्रजीमध्ये बोलतात. मराठी भाषा बोलताना ती तुच्छतेने बोलली जाते. इंग्रजी मात्र मोठेपणाचे लक्षण आहे. 

टॅग्स :mitएमआयटीSchoolशाळा