Pune Crime: कात्रज भाजी मंडई परिसरात डोक्यात दगड घालून एकाचा निर्घृण खून
By विवेक भुसे | Updated: January 13, 2024 11:02 IST2024-01-13T11:00:00+5:302024-01-13T11:02:08+5:30
मनोहर बागल (वय ५५, रा. शिवशंभोनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे....

Pune Crime: कात्रज भाजी मंडई परिसरात डोक्यात दगड घालून एकाचा निर्घृण खून
पुणे :कात्रज भाजी मंडई परिसरात एकाचा डोक्यात दगड घालून निर्घुण खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. मनोहर बागल (वय ५५, रा. शिवशंभोनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे.
कात्रज भाजी मंडई परिसरात एक व्यक्ती रक्ताच्या थोरोळ्यात पडल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहचले. तेथे जवळच एक बॅग पडली होती. त्यावरुन त्यांची ओळख पटली.
पोलिसांनी घरी संपर्क साधला असता ते एकटेच राहत आल्याची माहिती मिळाली खूनामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आहेत.