‘तो’ दोरीने उतरून गॅलरीतून घरात आला अन् महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 18:58 IST2022-06-02T18:53:57+5:302022-06-02T18:58:27+5:30

सकाळी पावणेदहाच्या सुमारासची घटना...

man came down in gallery demant of sex to woman pune crime news | ‘तो’ दोरीने उतरून गॅलरीतून घरात आला अन् महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

‘तो’ दोरीने उतरून गॅलरीतून घरात आला अन् महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

पिंपरी : सोसायटीच्या गच्चीमधून दोरीच्या साह्याने फ्लॅटच्या गॅलरीत उतरून महिलेला दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यानंतर तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली. संतनगर, मोशी येथे सोमवारी (दि. ३०) सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

निहाल शर्मा (वय २७, रा. लक्ष्मीनगर, मोशी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ३६ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. ३१) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला उच्चशिक्षित असून, खासगी नोकरी करते.

फिर्यादी आणि आरोपीची काही वर्षांपूर्वी गरबा खेळताना ओळख झाली होती. दरम्यान, आरोपी हा सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास फिर्यादीच्या सोसायटीच्या इमारतीत आला. सोसायटीच्या गच्चीमधून फिर्यादी महिलेच्या फ्लॅटच्या गॅलरीत दोरीच्या साह्याने उतरला. त्यावेळी महिलेने गॅलरीचा दरवाजा बंद केलेला होता. आरोपीने दरवाजा उघडण्यास सांगितले. तसेच महिलेकडे शरीरसुखाची मागणी करून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: man came down in gallery demant of sex to woman pune crime news