शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उसाची गाडी लावण्यावरून मारहाण प्रकरणी एकाला अटक, महिलेच्या पोटावर लाथ मारुन घडवून आणला होता गर्भपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 15:55 IST

महिलेच्या गर्भपातासारखा प्रकार घडल्यानंतरही पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले होते.

पुणे : उसाची गाडी का लावतो, असे म्हणून मारहाण करुन महिलेचा गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी पितापुत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. 

जयेश ऊर्फ जित अनिरुद्ध कुलकर्णी (वय ३६, रा. गणेश कुंज सोसायटी, रामबाग कॉलनी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचे वडिल अनिरुद्ध उद्धव कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबतची माहिती अशी, कोथरुडमधील रामबाग कॉलनी मधील गणेश कुंज सोसायटीच्या सार्वजनिक रस्त्यावर एका कुटुंबाने उसाचा लाकडी चरकातून रस काढण्याची गाडी लावली होती. या गाडीमुळे त्रास होतो, असे रहिवाशांचे म्हणणे होते. १७ फेब्रुवारी रोजी जयेश व अनिरुद्ध कुलकर्णी या पिता पुत्रांनी उसाची गाडी का लावतो, असे म्हणून संतोष भोसले यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. यावेळी त्यांची पत्नी मनिषा या भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असताना या दोघांनी त्यांच्या पोटावर लाथ मारली. त्यानंतर भोसले यांनी त्यांच्या पत्नीला ससून  रुग्णालयात नेले असता तेथे त्यांचा गर्भपात झाल्याचे आढळून आले. महिलेचा गर्भपातासारखा प्रकार घडल्यानंतरही कोथरुड पोलिसांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी महापालिकेकडे तक्रार करुन रहिवाशांच्या कृत्याचे समर्थन केले. या दाम्पत्यानेच मारहाण केल्याचा दावा केला होता. या घटनेनंतर मेधा कुलकर्णी, अनिता तलाठी व कुलकर्णी पितापुत्र या चौघांनी १९ मार्च रोजी येऊन तक्रार अर्ज मागे घे असे सांगून शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. येथे उसाची गाडी लावायची नाही, अशी धमकी दिल्याची तक्रार केली होती. त्यावरुन कोथरुड पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास केल्यानंतर शुक्रवारी रात्री कोथरुड पोलिसांनी गर्भपात घडवूनआणणे व मारहाण केल्याबद्दल पितापुत्रांवर गुन्हा दाखल केला. जयेश कुलकर्णी याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkothrudकोथरूड