आईच्या मृत्यूनंतर नराधमाचा १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; सावत्र बापाला जन्मठेप

By नम्रता फडणीस | Updated: April 10, 2025 20:26 IST2025-04-10T20:25:40+5:302025-04-10T20:26:19+5:30

सावत्र वडिलांबरोबर राहत असताना तिच्यावर बापाने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. कोणाला काही सांगितले तर तिला मारून टाकीन, अशी धमकी दिली होती

Man abuse 15y ear old girl after mother death Stepfather gets life sentence | आईच्या मृत्यूनंतर नराधमाचा १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; सावत्र बापाला जन्मठेप

आईच्या मृत्यूनंतर नराधमाचा १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; सावत्र बापाला जन्मठेप

पुणे : आईच्या मृत्यूनंतर सावत्र बापानेच १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता. मारहाणही करत असे. हा त्रास असह्य झाल्याने अल्पवयीन मुलीने घरातून पळ काढत कॅफे गाठले आणि लोकांची मदत मागितली. पीडितेने सावत्र बापाविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. अखेर आरोपी सावत्र बापाला विशेष न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी जन्मठेप आणि ७० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पीडित मुलगी, डॉक्टर तसेच कॅफे मधील मदत करणारा व्यक्ती यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

पीडित मुलीला ७० हजार रुपयांची रक्कम देण्यात यावी. तसेच पीडित मुलीला मनोधैर्य योजनेअंतर्गत भरपाई देण्यासंबंधी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला आदेशात सूचित केले आहे. या घटनेच्या वेळी पीडित मुलीचे वय १५ वर्षे होते. सावत्र वडिलांबरोबर राहत असताना तिच्यावर बापाने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. कोणाला काही सांगितले तर तिला मारून टाकीन, अशी धमकी दिली होती.

पीडित मुलीला आरोपीने फ्रिजची चावी जमिनीवर पडल्यावरून तिचे डोके फ्रिजवर आपटून तिला मारहाण केली. पीडित मुलीने घाबरलेल्या अवस्थेत घरातून पळ काढला. एका कॅफेमध्ये जाऊन तेथील लोकांना मदत मागितली. तेथील लोकांनी तिला मदत केली. त्यानंतर पीडितेने तिच्या सावत्र बापाविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर तपास वाकड पोलीस ठाण्याकडे वर्ग केला.

पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळवत त्याच्यावर दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्यात विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रह्मे यांनी एकूण ६ साक्षीदार तपासले. आरोपीच्या वतीने बचावासाठी ५ साक्षीदार तपासण्यात आले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक. पोलिस उपनिरीक्षक एस. जी. गोडे यांनी केला असून, खटल्यात पोलीस कर्मचारी डी. एस. पांडुळे व निलेश दरेकर यांनी कोर्ट कामकाजात मदत केली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे कोर्टाने आरोपीस दोषी धरत वरील शिक्षा सुनावली.

Web Title: Man abuse 15y ear old girl after mother death Stepfather gets life sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.