शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

माळीणकर पुन्हा आठवणींनी ‘खचले’

By admin | Updated: June 27, 2017 07:46 IST

माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील व्यक्तींच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पांत पहिल्याच पावसात अनेक त्रुटी समोर आल्या.

नीलेश काण्णव । लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील व्यक्तींच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पांत पहिल्याच पावसात अनेक त्रुटी समोर आल्या. पावसाचे पाणी बांधलेल्या गटारात न मावल्याने पाण्याचा लोंढा शाळेच्याजवळ आला व मातीच्या भरावावर बांधलेले रस्ते खचले, गटारे तुटली, पाइपलाइन उखडल्या, लाईटचे पोल वाकले, भिंतींना तडे गेले. पुन्हा एकदा माळीणची ती धडकी भरवणारी आठवण जागी झाली. पहिल्याच पावसात अशी दुरवस्था झाली तर पुढे मुसळधार पावसात काय होईल, या चिंतेने ग्रामस्थ भयभीत झाले असून पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहायला जाण्याची मागणी करू लागले आहेत. काही ग्रामस्थांनी तर पत्र्याच्या घरात जाण्याची बांधाबांध देखील सुरु केली आहे. माळीण दुर्घटनेला ३० जुलै रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत माळीणवासीयांचे दु:ख काही कमी होताना दिसत नाही. माळीणकरांना पक्की घरे देऊ, असे आश्वासन शासनाने दिले. त्याप्रमाणे घरेही दिली, पण पहिल्याच पावसात या गावातही जुन्या गावासारखी जमीन खचू लागली. गाव उभारण्याचे काम करताना केलेले मोठमोठे मातीचे भराव खचले. त्यामुळे अंतर्गत रस्ते खचले, अंतर्गत गटारे तुटली, पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन फुटल्या, ड्रेनेजलाईन उघडली, लाईटचे पोल पडल्याने अंतर्गत वीजपुरवठा खंडित झाला, चेंबर फुटले यामुळे नवीन माळीणची पुरती दयनीय अवस्था झाली.