शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

Malegaon Factory Election Result: उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिल्याच निकालात बाजी;माळेगाव कारखाना निवडणुकीत 'ब' वर्गातून दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:00 IST

Malegaon Sugar Factory Election Result: ‘दादां’ची कपबशी, आण्णाकाकांची किटली कि ‘साहेबांची तुतारी मारणार बाजी हे समजण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत.उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रथमच निवडणुकीच्या रींगणात उतरत स्वत:च्या नावाची चेअरमनपदासाठी घोषणा केली

Malegaon Karkhana Election Result- माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी(दि २४) सकाळी सुरवात झाली.यावेळी पहिल्याच निकालात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  बाजी मारली आहे.पवार यांंनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत 'ब' वर्गातुन दणदणीत विजय मिळवला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय भवन बारामती येथे मतमोजणी पार पडत आहे. या मध्ये ब वर्ग प्रतिनिधीची मतमोजणी प्रारंभी झाली ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार होते. प्रथम ब वर्गासाठी मतमोजणी झाली. या वर्गात ९९ टक्के मतदान झाले होते. अपेक्षेप्रमाणे सर्व संस्थावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांना १०१ त्यापैकी तब्बल ९१ एवढी मते पडली तर विरोधी सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांना १० एवढीच मते मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दणदणीत विजय झाल्याने सभासद व कार्यकर्ते यांनी आनंदोत्सव साजरा केला.

दरम्यान,माळेगांव’चा कारभारी आज ठरणार आहे.गुलाल कोणाचा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘दादां’ची कपबशी, आण्णाकाकांची किटली कि ‘साहेबांची तुतारी मारणार बाजी हे समजण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत.उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रथमच निवडणुकीच्या रींगणात उतरत स्वत:च्या नावाची चेअरमनपदासाठी घोषणा केली. शिवाय पवार यांनी हि निवडणुक प्रतिष्ठेची केल्याने या लढतीला लोकसभा, विधानसभा निवडणुकीपेक्षा महत्त्व आले आहे. निकालाची कधी नव्हे यंदा मोठी उत्सुकता ताणली आहे.त्यामुळे केवळ माळेगांवकरांचीच नव्हे तर संपुर्ण राज्याचे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.‘गुलाल आमचाच’ असे म्हणत अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या पैंजा लागल्याचे चित्र आहे.निवडणुकीत वाढलेल्या मतदानाचा टक्का कोणाला मारक,तर कोणाला तारक ठरणार,याची उत्सुकता वाढली आहे..मुख्य लढत उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांच्या पॅनल मध्ये होत असली तरी शरद पवार गट व कष्टकरी शेतकरी समितीतील उमेदवार किती व कसे मतदान घेणार यावरही जय पराजयाचे गणित अवलंबुन आहे. दरम्यान तावरे,जगताप,गावडे,काटे,देवकाते,कोकरे ,बुरुंगले,गोफणे,आटोळे,पोंदकुले,खलाटे,येळे,ढवाण,सस्ते, निंबाळकर,धुमाळ आदी आडनावांच्या मतदारांच्या मताला विशेष महत्त्व असुन त्यांनी पॅनल टु पॅनल मतदान केले आहे का? हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘माळेगांव’ची मतमोजणी मंगळवारी (दि २४) प्रशासन भवन अभियांत्रिकी भवनाच्या पार्किगमध्ये सकाळी ९ वाजल्यापासून सुरु  आहे.३४ टेबलवर २ फेरीत मतमोजणी होत आहे. सुरवातीला ‘ब’ वर्ग उमेदवाराची मतमोजणी पार पडली..त्यानंतर अनुसुचित जाती व जमाती,इतर मागास प्रवर्ग,भटक्या विमुक्त जाती व जमाती,महिला राखीव प्रतिनिधी,त्यानंतर माळेगाव, पणदरे, सांगावी, नीरावागाज आणि बारामती या क्रमाने मतमोजणी केली जाणार आहे.पहिल्या फेरीत ३४ टेबलवर ३४ केंद्राची मतमोजणी होणार असून टेबल क्रमांक ३४ वर ब वर्ग केंद्राची मतमोजणी होणार आहे. माळेगाव कारखान्याची निवडणुक संवेदनशील आहे.माळेगांव कारखान्याच्या मतमोजणीसाठी २५० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा मतमोजणीसाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे,अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.सुदर्शन राठोड यांनी दिली.

 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीResult Dayपरिणाम दिवस