शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या मेसेजने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली’ अजितदादांच्या रणनीतीचे ‘सिक्रेट’ उलगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:20 IST

-  त्या एस एम एसने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली,अशी त्यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी याबाबत सोशल मिडीयावर केलेली पोस्ट चर्चेेत आली आहे.  

बारामती - माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २० जागांवर एकहाती वर्चस्व मिळवत  जिंकली. यामध्ये विरोधकांना केवळ एका जागेवर समाधान मानावं लागले.मात्र,यंदा पवार उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वत: उमेदवार जाहिर करुन थांबले नाहित.तर स्वत:चेच नाव कारखान्याचे अध्यक्षपदासाठी घोषित केले.त्यामुळे बारामतीकरांच्या भुवया उंचावल्या होत्या.तसेच पवार यांच्या रणनीतीचा ‘सस्पेन्स’ कायम होता.आता मात्र, पवार यांचे यांचे ‘सिक्रेट’ समोर आले आहे. त्या एस एम एसने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली,अशी त्यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी याबाबत सोशल मिडीयावर केलेली पोस्ट चर्चेेत आली आहे.बारामतीच्या राजकारणात पवार यांनी विधानसभा निवडणुकीशिवाय इतर निवडणुकीत  स्वत:ची उमेदवारी जाहिर करण्याची पहिलीच वेळ  आहे.त्यामुळे पवार यांच्या रणनीतीचा ‘सस्पेन्स’ कायम होता.आता याबाबत माहिती पुढे आले आहे.मुसळे म्हणतात, कारखाना निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूक्ष्म नियोजन आणि नेटके व्यवस्थापन या निवडणुकीत दिसून आले. निवडणुकीत अनेकदा जनता काय म्हणते तो आवाज ऐकण्याची गरज असते. निवडणुकीच्या सुरुवातीला एका सामान्य कार्यकर्त्यांने दादांना 'दादा चेअरमनपदाचा उमेदवार जाहीर करू नका. नाहीतर तुम्हीच चेअरमन व्हा.'एका एक मनस्वी मेसेज पाठवला होता. त्यात दादांच्याबद्दलचे भाबडे आणि खरे प्रेम होते. त्या एस एम एसने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली. निवडणूक चर्चेत आली कारण दादांनी स्वतःला चेअरमनपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले.  दादा स्वतः चेअरमन होणार यामुळे कार्यकर्ते ताकदीने लढले.दादांची घोषणा ही एक अस्मिता बनली. साखर कारखाना क्षेत्रातला त्यांचा अनुभव हा माळेगाव कारखान्याला अजून उर्जित अवस्था आणेल असा विश्वास यामुळे निर्माण झाला.सभासदांना दादांचे नेतृत्व आश्वासक वाटले, कार्यकर्त्यांच्यात उत्साह निर्माण झाला.कारखान्याच्या प्रगतीच्या दृष्टीने अनेक सकारात्मक गोष्टी त्यांनी मांडल्या, त्या सभासद शेतकऱ्यांना भावल्या. स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा कारखान्याचे चेअरमन होणार ही गोष्ट लोकांना भावली. मुळात ही घोषणा लोकांना अनपेक्षित होती, त्यामुळे दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सभासदांनी अभूतपूर्व यश दिले. निर्णायक कौल दिल्याचे मुसळे यांनी पोस्ट मध्ये नमुद केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारResult Dayपरिणाम दिवस