शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात रसिकांना मल्याळम चित्रपटांची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 9:09 PM

मल्याळम चित्रपटांनी आपल्या वास्तववादी आणि चिकित्सक दृष्टीकोनामुळे राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट रसिकांकडून खास पावती मिळवली आहे.

ठळक मुद्दे ‘अलोरुक्कम’, ‘ओट्टल’, ‘टेक आॅफ’ सारखे गाजलेले मल्याळम चित्रपट पाहण्याची संधी राज्या राज्यातील सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत या चित्रपट महोत्सवाचे आयोजन

पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात २० ते २२ एप्रिल दरम्यान चित्रपट रसिकांसाठी मल्याळम चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केरळ राज्य चलचित्र अकादमीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात अनेक नामांकित समांतर मल्याळम चित्रपट पहायला मिळणार असल्याने रसिकांना पर्वणी ठरणार आहे.मल्याळम चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन समारंभास अभिनेत्री आणि केरळ राज्य चलचित्र अकादमीच्या उपाध्यक्षा बीना पॉल उपस्थित राहणार आहेत. २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता उदघाटन होणार आहे. ‘अलोरुक्कम’ या चित्रपटाने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. महोत्सवात एकूण १२ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. त्यामध्ये ‘थोंडीमुथालम दृकशियम’, ‘अलोरुक्कम’, ‘ओट्टल’, ‘टेक आॅफ’ सारखे गाजलेले मल्याळम चित्रपट पाहण्याची संधी यावेळी मिळणार आहे. प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांची भारतीय चित्रपटसृष्टीत स्वत:चे अजोड स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये विशेषत: मल्याळम चित्रपटांनी आपल्या वास्तववादी आणि चिकित्सक दृष्टीकोनामुळे राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट रसिकांकडून खास पावती मिळवली आहे. राज्याराज्यातील सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्याद्वारे विद्यार्थी तसेच चित्रपट रसिकांना मल्याळी चित्रपटांच्या नवीन प्रवासाची ओळख होणार आहे. या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, जास्तीत जास्त रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेcinemaसिनेमा