शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाकडं करून मग सरळ ? दत्ता भरणेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:12 IST

- वाकडं काम करून परत सरळ करणं लक्षात राहतं, कृषीमंत्री दत्ता भरणे यांचं विधान; रोहित पवारांची जोरदार टीका

पुणे -  राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात वादग्रस्त विधान करून उपस्थितांचं लक्ष वेधलं. महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भरणे म्हणाले, "सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात." या वक्तव्यानंतर सभागृहात क्षणभर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, कृषीमंत्री काय बोललेत? वाकडी कामं पण नंतर सरळ करावी लागतात म्हणे, महायुतीने महाराष्ट्राची तिजोरीच वाकडी केली आहे. वाकडं काम करण्यासाठी तुम्हाला कृषी खाते दिलं नाही. सरळ काम करणाऱ्यांच्या आम्ही पाठीशी आहोत. पण जर तुमच्याकडून वाकडं काही झालं, तर महाराष्ट्र माफ करणार नाही. भरणे यांच्या विधानामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.  

यावेळी त्यांनी  पुण्यातून अनेक कंपन्या इतर राज्यात जात असल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले रोहित पवार म्हणाले, तळेगाव चाकण या परिसरातील आणि कंपन्या इतर राज्यात जात आहेत,  दरम्यान, काही नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडीतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रकल्पाचे काम देण्यास स्पष्ट शब्दांत नकार देण्यास सुरुवात केली आहे. हिंजवडी आयटी पार्कची प्रतिमा अलीकडच्या काळात सुमार दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे डागाळू लागली आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था, सकाळी आणि संध्याकाळी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे परिसरातील अनेक आयटी आणि अन्य कंपन्यांची आंतरराष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करताना दमछाक होत आहे. नवीन प्रकल्प मिळविताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :PuneपुणेRohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवारAgriculture Sectorशेती क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र