शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेला मी उभा करीन त्या उमेदवाराला विजयी करा; बारामतीकरांना अजित पवारांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 13:15 IST

नुसते इकडे तिकडे फिरणारे खासदार नकोत, विकास कामे करणारे खासदार आपल्याला हवेत

बारामती: गेली अनेक वर्षे आपण वरिष्ठांच्या विचारांना मान देत त्यांच्या विचारांच्या उमेदवारांना विजयी केले, यापुढील काळात मात्र अजित पवार हाच लोकसभेचा उमेदवार आहे. असे समजून मी उभा करीन त्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस विशाल जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रमात पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट बारामती लोकसभा मतदारसंघात आमने सामने येणार असल्याचे संकेत दिले. पवार म्हणाले, मी केलेल्या विकास कामांची मला जर तुम्हाला पावती द्यायची असेल तर या लोकसभेला मी उभा करेन त्या उमेदवाराच्या पाठीशी बारामतीकरांनी खंबीरपणे उभे राहा. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांना भावनिक आवाहन केले जाईल. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, ही शेवटची निवडणूक आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र भावनिक न होता बारामतीच्या विकासाच्या दृष्टीने कोण उमेदवार विकासाचे प्रकल्प राबवू शकेल, याचा विचार करून बारामतीकरांनी मतदानाचा निर्णय घ्यावा. नुसतेच शेवटची निवडणूक म्हणतात पण शेवटची निवडणूक केव्हा होईल, हेच समजत नाही, असा टोला त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत. तुमच्या लोकप्रतिनिधीला थेट देशाचे पंतप्रधान चांगले ओळखतात. त्यामुळे आपल्या विचाराचा खासदार निवडून आला तर विकासाची कामे अधिक वेगाने मार्गी लावण्यासाठी मी पंतप्रधानांकडे आग्रह धरू शकेल. त्यामुळे अजित पवार हेच निवडणुकीला उभे आहेत असे समजून बारामतीकरांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. नुसते इकडे तिकडे फिरणारे खासदार नकोत, विकास कामे करणारे खासदार आपल्याला हवेत, असे म्हणत पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील निशाणा साधला. दरम्यान ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनातचं बारामती लोकसभा उमेदवार कोण ,या प्रश्नाचे उत्तर दडले आहे . पत्नी सुनेत्रा पवार याच लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार असण्याची शक्यता आता अधिक गडद झाली आहे . शकतील, अशा स्वरूपाची चर्चा बारामतीत सुरू झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपा