एका मिनिटात करुन दाखवा शाॅर्ट फिल्म; पुण्यात अागळे-वेगळे शाॅर्ट फिल्म फेस्टिवल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 06:21 PM2018-04-02T18:21:13+5:302018-04-02T19:18:20+5:30

पुण्यात पहिल्यादाच 'दि 60 सेकंड फिल्म फेस्टिवलचे' अायाेजन करण्यात अाले अाहे. या फेस्टिवलमध्ये केवळ 1 मिनिटाच्या शाॅर्ट फिल्म्स तयार करायच्या अाहेत.

make a short film of one minute duration, new short film festival in pune | एका मिनिटात करुन दाखवा शाॅर्ट फिल्म; पुण्यात अागळे-वेगळे शाॅर्ट फिल्म फेस्टिवल

एका मिनिटात करुन दाखवा शाॅर्ट फिल्म; पुण्यात अागळे-वेगळे शाॅर्ट फिल्म फेस्टिवल

Next
ठळक मुद्देएका मिनिटाची तयार करावी लागणार शाॅर्ट फिल्मभारतात पहिल्यांदाच हाेतंय हे फेस्टिवल

पुणे : तुम्हाला शाॅर्ट फिल्म करायची इच्छा अाहे पण संधी मिळाली नसेल तर अाता तुमची कला जगभर दाखविण्याची संधी तुम्हाला मिळणार अाहे. भारतात पहिल्यांदाच 'दि 60 सेकंड फिल्म फेस्टिवल' अायाेजित करण्यात अाले असून यात केवळ 60 सेकंदाची शाॅर्टफिल्म तयार करायची अाहे. त्यामुळे तुमच्याकडे जर 60 सेकंदामध्ये एखादा विषय मांडण्याची कला असेल तर तुम्ही जरुर या शाॅट फिल्म फेस्टिवलमध्ये उतरु शकता.
   अमेरिकेच्या अाॅलिव्हर वाेल्फसन यांची ही मूळ संकल्पना असून या अाधी बॅंकाॅकमध्ये अश्या पद्धतीचे अांतरराष्ट्रीय फेस्टिवल भरविण्यात अाले हाेते. यंदा हे फेस्टिवल भारतात त्यातही पुण्यात भरविण्यात येणार अाहे. या फिल्म फेस्टिवलला जगभरातील दिग्गज उपस्थित राहणार अाहेत. या फेस्टिवलसाठी कुठल्याही विषयाचे बंधन नसून फक्त 60 सेकंदामध्ये तुमचा विषय तुम्हाला मांडायचा अाहे. डाॅक्युमेंटरी, महिला सक्षमिकरण, मानवी हक्क, पब्लिक अवेरनेस, अार्ट, फॅशन, एक्सपेरिमेंटल, म्युझिक व्हिडिअाे, नाट्यकथन, काॅमेडी, राेमान्स, अॅक्शन, थ्रिलर अश्या कुठल्याही प्रकरातील शाॅर्ट फिल्म तुम्ही तयार करु शकता. त्याचबराेबर तुम्ही कुठल्याही साधनांच्या अाधारे हि फिल्म शूट करु शकता. फक्त ती एमपीईजी 4 फाॅरमॅट मध्ये असणे अपेक्षित अाहे. या फेस्टिवलमध्ये 120 बेस्ट फिल्मस दाखवल्या जाणार अाहेत. त्यातील पहिल्या विजेत्याला 50 हजार रुपये, दुसऱ्या विजेत्याला 30 तर तिसऱ्या विजेत्याला 20 हजार रुपयांचे पारिताेषिक देण्यात येणार अाहे. तुमची फिल्म ही यु-ट्यूबद्वारे, वी ट्रान्सफर, गुगल ड्राईव्ह किंवा ड्राॅपबाॅक्स द्वारे सबमीट करु शकता. किंवा http://the60secondfilmfestival.com/submit-a-film/या लिंकवर मेल करु शकता. तुमची फिल्म सबमिट करण्याची 7 मे ही अंतिम तारीख असून 19 मे राेजी पु्ण्यातील नाेवाेटेल हाॅटेलमध्ये निवडलेल्या शाॅर्ट फिल्म्सचे स्क्रिनिंग करण्यात येणार अाहे. 
    याबाबत बाेलताना या फेस्टिवलच्या अायाेजक सपना मदने म्हणाल्या,  दि 60 सेकंड फिल्म फेस्टिवल हे भारतात पहिल्यांदाच हाेत अाहे. यात सहभागी हाेणाऱ्याला केवळ 60 सेकंदामध्ये अापला विषय शाॅर्ट फिल्मच्या माध्यमातून मांडायचा अाहे. जगभरातील अनेक फिल्म मेकर्स या फेस्टिवलमध्ये सहभागी हाेत असून भारतीय फिल्म मेकर्सना यानिमित्ताने अापली कला दाखवण्याची नामी संधी मिळाली अाहे. या स्पधेत सहभागी हाेण्यासाठी प्रवेश शुल्क अाहे. 

Web Title: make a short film of one minute duration, new short film festival in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे