शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य आरोपी दोन वर्षांनंतरही मोकाटच

By admin | Updated: February 17, 2017 04:57 IST

वघ्या महाराष्ट्राला हेलावून सोडलेल्या येथील कुमार रिसॉर्ट येथील अल्पवयीन बालिका अपहरण, बलात्कार व खून प्रकरणाला

लोणावळा : अवघ्या महाराष्ट्राला हेलावून सोडलेल्या येथील कुमार रिसॉर्ट येथील अल्पवयीन बालिका अपहरण, बलात्कार व खून प्रकरणाला गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली. मात्र, या घटनेचा मुख्य आरोपी अजूनही मोकाटच असल्याने या बालिकेचे आई-वडील न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कुमार रिसॉर्ट या हॉटेलमध्ये १५ फेब्रुवारी २०१५ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव, ता. इंदापूर येथे राहणारे छगन चंपालाल जैन सात वर्षांच्या मुलीसह गावातील एका लग्नसमारंभासाठी आले होते. रात्री साडेआठच्या सुमारास रिसॉर्टच्या मॅरेज लॉन परिसरातून आयेशा जैन या सातवर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. पुढे तपासात दोन दिवसांनी १७ फेब्रुवारी रोजी रिसॉर्टच्या टेरेसवरील सोलर पॅनलजवळ आयेशाचा मृतदेह मिळून आला. बलात्कार करून नंतर गळा चिरत तिचा खून करण्यात आला असल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये स्पष्ट झाले होते. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेनंतर संतप्त झालेले मुलीचे नातेवाईक व लोणावळ्यातील ग्रामस्थ यांनी लोणावळा बंद पुकारत तीव्र आंदोलन केले होते. मोर्चाला हिंसक वळण लागल्याने रिसॉर्टची आंदोलकांनी तोडफोड केली होती. सदर घटना माध्यमांमधून वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने राज्यभरात सर्वत्र या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. पर्यटननगरी लोणावळा शहर या घटनेमुळे काही काळ अस्थिर झाले होते. या घटनेचे गंभीर परिणाम येथील अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष रॉय हा वेश बदलून लोणावळ्यातून फरार झाल्याने तो पोलिसांच्या हाती न लागल्याने शहरात मोर्चा, आंदोलन या मार्गांनी महिनाभर निषेध सुरूच होते. अखेर राज्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री राम शिंदे, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, पालकमंत्री गिरीष बापट आदी नेत्यांनी लोणावळ्यात येत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, शहर शांत होण्याचे नाव घेत नव्हते. याप्रकरणी मुख्य आरोपी रॉय याला मदत करणारा सहआरोपी अजय दोदाड याला अटक करत त्याची लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात आली होती. (वार्ताहर)