शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

विधानसभेला आमदार महेश लांडगे यांनी शिवसेनेतून उभे राहावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 20:20 IST

भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे.

ठळक मुद्दे: शिवाजी आढळराव पाटील : भोसरी मतदारसंघावर शिवसेनेचा दावा 

पिंपरी :भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम राहणार आहे. त्यामुळे विधानसभेला भाजप व शिवसेना युती झाली तर आमदार महेश लांडगे यांनी शिवसेनेतून लढावे, अशी माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी भोसरीत सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाप्रमुख नीलेश मुटके, माजी गटनेत्या सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, उपशहरप्रमुख नेताजी काशिद, उपशहरप्रमुख आबा लांडगे आदी उपस्थित होते. निवडणुकीच्या तोंडावर कोणी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करतो आहे. सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इंदापूरमध्ये एक वजनदार नेता भाजपत प्रवेश करणार आहे, मात्र त्या ठिकाणी शिवसेनेला जागा जाणार आहे.  भोसरीमध्ये सुद्धा शिवसेनेची ताकद आहे. आमदार महेश लांडगे यांना माझा विरोध नाही. लांडगे यांनी शिवसेनेकडून विधानसभा लढवावी. विधानसभेला युती झाल्यास आणि भोसरी विधानसभेत शिवसेनेला जागा मिळाल्यास निवडून येणाऱ्या उमेदवाराला संधी  देण्यात येईल, असे आढळराव पाटील यांनी सांगितले.----- शिरूर लोकसभेत माझा पराभव हा भावनेचे राजकारण व जातीय समीकरणाने झाला. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभेसाठी किती वेळ काढला, भोसरीमध्ये किती वेळा आले, हडपसरमध्येही फिरकलेच नाही, त्यामुळे नागरिक आता पश्चाताप करत आहेत. भोसरी आणि हडपसरला ते कितीवेळा आले.  याचाच फायदा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला होईल, असा दावा खासदार आढळराव पाटील यांनी केला.

टॅग्स :bhosariभोसरीbhosari-acभोसरीElectionनिवडणूकMLAआमदारBJPभाजपाShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळराव