शहरं
Join us  
Trending Stories
1
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
2
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
3
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
4
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
5
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
6
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
7
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
8
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
9
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
10
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
11
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
12
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
13
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
14
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
15
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
16
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
17
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
18
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
19
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
20
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 

पुणेकरांवर महावितरणकडून कारवाईचा बडगा; २५ हजारांवर थकबाकीदारांची वीज खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:45 IST

थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे

पुणे: पुण्यात महावितरणकडून तब्बल २५ हजार ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.  ग्राहकांनी थकीत वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे पुणे परिमंडलामध्ये गेल्या २४ दिवसांत २५ हजार ४३४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सद्यस्थितीत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही ८८ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे शहरात ४० कोटींची थकबाकी 

पुणे शहरात एकूण घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे ४० कोटी ९ लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २४ दिवसांमध्ये १० हजार १७७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. 

पिंपरी चिंचवडमध्ये १८ कोटींची थकबाकी 

पिंपरी चिंचवड शहरात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे १८ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ७ हजार ७९६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. 

पुणे ग्रामीणमध्ये २९ कोटींची थकबाकी 

ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड, हवेली तालुक्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे २९ कोटी ९६ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ७ हजार ४६१ ग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या २४ दिवसांत खंडित करण्यात आला.

थकबाकीचा त्वरीत भरणा करावा

महावितरणची संपूर्ण आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसूलीवरच आहे. वीजबिलांच्या वसूलीमधूनच वीजखरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसूलीला मोठा वेग देण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणelectricityवीजMONEYपैसाSocialसामाजिकHomeसुंदर गृहनियोजन