शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

'महाविकास आघाडी सरकारने विकासकाम दाखवा'; या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या भाजपला अजितदादांचे जोरदार प्रत्यत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 11:33 IST

पालकमंत्री या नात्याने अनेक विकासकामांचा आढावा घेत असतो आणि घेत आलो आहे

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली जात आहेत

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप 'विकासाची पोलखोल' ही स्पर्धा जाहीर केली होती. यामध्ये पुण्यातील नागरिकांनी व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणार्‍या विजेत्या स्पर्धकास बक्षीसं देखील दिली जाणार होत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सत्ताधारी भाजपने उडी घेत महाविकास आघाडी सरकारला आव्हान केले होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी देखील अशाच प्रकाराची घोषणा केली असून राज्यात गेल्या दीड वर्षात सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारने पुणे शहरासाठी केलेले एक भरीव 'विकासकाम दाखवा' ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यावरच अजित पवारांनी पुण्यातील भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

पवार म्हणाले की, आज शहरातील नदी सुधार कार्यक्रमाकरता आयुक्तांसोबत बैठक घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारने काय केलं ते दाखवा, असे बक्षीस भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे. पण मी पालकमंत्री या नात्याने अनेक विकासकामांचा आढावा घेत असतो आणि घेत आलो आहे. त्यामध्ये पुण्यातील विकास कामांना निधी देण्याचं काम केले आहे. मेट्रोचा हप्ता थकायला नको म्हणून प्रयत्न करत आहे. मेट्रोचं जाळं शहराच्या चारी बाजूने कसे नेता येईल यासाठी माझा प्रयत्न असल्याचं सांगत त्यांनी भाजपाच्या नेत्यांना टोला लगावला.

वन विभागाच्या ३५ एकर जागेमध्ये भव्य संजीवन उद्यानाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अजित पवार बोलत होते. 

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली जात आहेत 

 ''राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण आज वन विभागाच्या ३५ एकर जागेमध्ये भव्य संजीवन उद्यानाचे भूमिपूजन केले आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष पाहण्यास मिळणार आहे. या उद्यानात येणार्‍या नागरिकांना चांगली हवा मिळणार आहे. पण आता यामध्ये काही झाडे तोडली जाणार आहेत. पण तिथे अधिकाधिक नव्याने झाडे लावली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.''

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रjagdish mulikजगदीश मुळीकNCPराष्ट्रवादी काँग्रेस