शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

Mahashivratri 2025 : भीमाशंकर येथे महाशिवरात्रीचा जल्लोष; मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:00 IST

मध्यरात्री बारा वाजता शासकीय महापूजा पार पडली. या पूजेस माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते

पुणेबारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी हजेरी लावली. पहाटेच्या पवित्र दर्शनासोबतच दिवसभर मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. मंदिराचा गाभारा व परिसर रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला होता, तसेच विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले होते.  मध्यरात्री बारा वाजता शासकीय महापूजा पार पडली. या पूजेस माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, भोसरीचे आमदार महेश लांडगे, खेडचे आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश कौदरे व इतर मान्यवर उपस्थित होते. पूजेनंतर वेदपठण करण्यात आले आणि प्रत्यक्ष यात्रेस सुरुवात झाली.  भाविकांनी "हर हर महादेव" आणि "भीमाशंकर महाराज की जय" च्या जयघोषात दर्शन घेतले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ अधिकारी, २२१ पोलीस कर्मचारी, ६० होमगार्ड आणि श्वान पथक तैनात करण्यात आले होते. गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि चित्रीकरण पथकेही कार्यरत होती.  बसस्थानक ते मंदिर मार्गावर बेलफुल, पेढे आणि खाद्यपदार्थांची दुकाने सजली होती. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ३५ मिनी व मोठ्या एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच आरोग्य विभागाचे वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. अवैध दारू आणि भांग विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी कारवाई केली.  रात्री दोन वाजल्यापासून गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आणि दर्शन रांग जुन्या एमटीडीसीपर्यंत, म्हणजे तब्बल दोन किलोमीटरपर्यंत पोहोचली. भाविकांचे दर्शन सुलभ होण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त आणि कर्मचारी सतत प्रयत्नशील होते.  महाशिवरात्री यात्रा यंदाही भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMahashivratriमहाशिवरात्रीcultureसांस्कृतिकBhimashankarभीमाशंकर