‘कार्बन न्यूट्रल’च्या दिशेने महर्षी कर्वे शिक्षण संस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 02:26 PM2020-02-10T14:26:26+5:302020-02-10T14:41:10+5:30

दररोजच्या घडामोडीमधून कमीत कमी कार्बन उत्सर्जन कसे करता येईल, यावर उपाययोजना

Maharshi Karve Education Institute towards 'Carbon Neutral' | ‘कार्बन न्यूट्रल’च्या दिशेने महर्षी कर्वे शिक्षण संस्था

‘कार्बन न्यूट्रल’च्या दिशेने महर्षी कर्वे शिक्षण संस्था

Next
ठळक मुद्देकॅम्पसचे केले कार्बन ऑडिट : उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू मोबाईल, डेस्कटॉप, संगणक, टीव्ही, म्युझिक प्लेअर, डीव्हीडी प्लेअर, प्रिंटर आदी वस्तूंचा समावेशकॅम्पसमध्ये सर्वाधिक कार्बन डायॉक्साइड विजेच्या वापरातून निर्माण होत असल्याचे समोर

श्रीकिशन काळे - 

पुणे : पुणे शहराला २०३० पर्यंत ' कार्बन न्यूट्रल ' शहर बनविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच आता महाविद्यालयांनीदेखील त्यात सहभाग घेऊन कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पुढाकार घेऊन अंमलबजावणी केली आहे. अशाच प्रकारे इतर महाविद्यालयांनीदेखील उपक्रम राबविल्यास पुणे न्यूट्रलकडे वाटचाल करू शकणार आहे. 
कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत हा उपक्रम राबविला जात आहे. त्यासाठी सुरूवातीला कॅम्पसमध्ये किती कार्बन उत्सर्जन होते, त्याचे ऑडिट करण्यात आले. यावर भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्टच्या फॅकल्टी प्रा. प्राजक्ता दलाल-कुलकर्णी आणि मास्टर ऑफ आर्किटेक्ट पर्यावरणाच्या विद्यार्थी ऐश्वर्या शेंडगे यांनी काम केले. दररोजच्या घडामोडीमधून कमीत कमी कार्बन उत्सर्जन कसे करता येईल, यावर अगोदर उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले. 


संस्थेच्या बाया कर्वे हॉस्टेल, रमा सदन हॉस्टेल, सर ससून हॉस्टेल, कमिन्स कॉलेज, भानुबेन नानावटी कॉलेज, एमबीए कॉलेज आणि सिद्धीविनायक कॉलेजमध्ये किती ऊर्जा लागते, त्याचे आॅडिट काढण्यात आले. त्यानुसार कुठे ही ऊर्जा कमी करून सौरऊर्जा किंवा इतर उपाय करता येतील, यासाठी प्रयत्न करण्यात आले. 
इंधन, वीज, पाणी, वेस्ट आदींबाबतही माहिती संकलित करण्यात आली. कॅम्पसमधील ई-वेस्टसुद्धा काय निर्माण होते आणि त्याचा वापर कसा करता येऊ शकतो, यावर उपाय करणे सुरू केले. 
........
विजेचा वापर करणार कमी 
संपूर्ण कॅम्पस ३४ एकरांत वसलेला आहे. सर्वप्रथम इंधनाचा वापर कमी करण्यावर भर देण्याचे ठरले. विजेचा कमी वापर करायचा आणि एकमेकांच्या मदतीने उपाय करता येतील, यावर चर्चा केली. प्रत्येकाने यात वाटा उचलणे आवश्यक होते. त्यामुळे सर्वांना याबाबत माहिती देण्यात आली.
......
तुमचे ई-वेस्ट द्या आम्हाला ! 
कॅम्पसमध्ये ई-वेस्ट संकलित करण्यासाठी उपक्रम राबविला जातो. त्यात विद्यार्थ्यांनी आपले ई-वेस्ट दान करायचे किंवा त्याचा पुनर्वापर करायचे. यात मोबाईल फोन, डेस्कटॉप, संगणक, टीव्ही, म्युझिक प्लेअर, डीव्हीडी प्लेअर, प्रिंटर आदी वस्तूंचा समावेश आहे. यामुळे नवीन काही करायचे असेल, तर त्यासाठी यातील वस्तू वापरून उपक्रम करता येईल आणि नवी वस्तू घ्यायची गरज पडणार नाही, असा उपक्रम आहे. 
..............
कॅम्पसमध्ये सर्वाधिक कार्बन डायॉक्साइड विजेच्या वापरातून निर्माण होत असल्याचे समोर आले. तसेच वाहतूकव्यवस्थेचाही त्यात समावेश होता. यावर उपाय म्हणून कमी विजेचा वापर करणारी उपकरणे बसविणे, सौरऊर्जेचा वापर करणे, सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करणे, इलेक्ट्रिक गाडीचा वापर करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. - प्रा. प्राजक्ता दलाल-कुलकर्णी,कार्यक्रम समन्वयक .
................
 

Web Title: Maharshi Karve Education Institute towards 'Carbon Neutral'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.