महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 14:54 IST2021-04-02T14:47:50+5:302021-04-02T14:54:31+5:30

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात त्यांनी भरीव दिले होते योगदान दिले

Maharashtrian Mandal associate Dhananjay Damle passed away | महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांचे निधन

महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांचे निधन

ठळक मुद्देपुण्यातील क्रीडाक्षेत्रातील उत्कृष्ट क्रीडा संघटक

महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय रमेश दामले यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी नेहा , मुलगा रणजी क्रिकेटपटू रोहन आणि सून डाॅ. तन्मयी आणि एक बहीण असा परिवार आहे. धनंजय दामले गेली ९ वर्ष महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस म्हणून काम करत होते. सध्या ते पुणे जिल्हा अथेलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष, पुणे जिल्हा जलतरण संघटना आणि पुणे जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे कार्याध्यक्ष मल्लखांब काम करत होते.

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.  आजोबा शिवरामपंत दामले आणि वडील रमेश दामले यांचा वारसा ते समर्थपणे चालवत होते. त्यांची चला मैदानावर, रहा निरोगी या दोन पुस्तकांसह क्रीडा विषयावर विपूल लेखन केले आहे. पुण्यातील क्रीडाक्षेत्रातील उत्कृष्ट क्रीडा संघटक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकार पदाधिकाऱ्याच्या अकाली निधनाने या क्षेत्रांचे अपरिमित नुकसान झाले आहे.

Web Title: Maharashtrian Mandal associate Dhananjay Damle passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.