Maharashtra: गुणवत्तापूर्ण सेवेबाबत राज्यातील कारागृहाच्या ९ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

By विवेक भुसे | Published: January 25, 2024 03:02 PM2024-01-25T15:02:40+5:302024-01-25T15:03:55+5:30

कारागृह विभागात वैशिष्टयपूर्ण सेवेबद्दल कोल्हापूर, तळोजा, मुंबई, येरवडा, छत्रपती संभाजीनगर, अकोला मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक जाहीर झाले आहे....

Maharashtra: President's medal announced to 9 jail officers in the state for meritorious service | Maharashtra: गुणवत्तापूर्ण सेवेबाबत राज्यातील कारागृहाच्या ९ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

Maharashtra: गुणवत्तापूर्ण सेवेबाबत राज्यातील कारागृहाच्या ९ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

पुणे : गुणवत्तापूर्ण सेवेबाबत राज्यातील कारागृहातील ९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतीचे सुधार सेवापदक केंद्रीय गृह विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. कारागृह विभागात वैशिष्टयपूर्ण सेवेबद्दल कोल्हापूर, तळोजा, मुंबई, येरवडा, छत्रपती संभाजीनगर, अकोला मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक जाहीर झाले आहे.

राष्ट्रपतींचे सुधार सेवापदक मिळालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे - रुकमाजी भुमन्ना नरोड (तुरुंगाधिकारी, अहमदनगर जिल्हा कारागृह), सुनिल यशवंत पाटील (तुरुंगाधिकारी, तळोजा मध्यवर्ती कारागृह), बळीराम पर्वत पाटील (सुभेदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह), सतीश बापूराव गुंगे (सुभेदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह), सुर्यकांत पांडूरंग पाटील (हवालदार, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह), नामदेव संभाजी भोसले (हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह), संतोष रामनाथ जगदाळे (हवालदार, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह), नवनाथ सोपान भोसले (हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह), विठ्ठल श्रीराम उगले (हवालदार, अकोला जिल्हा कारागृह). राष्ट्रपतींचे सुधार सेवापदक जाहिर झाल्याबद्दल कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा जालिंदर सुपेकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Maharashtra: President's medal announced to 9 jail officers in the state for meritorious service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.