शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रातील महाराष्ट्राच्या नेत्यांना राज्यात आल्यावर कांद्याची माळ घालू; अमोल कोल्हेंचे आळेफाट्यावर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 14:45 IST

केंद्र सरकारने विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय अत्यंत दुर्दैवी

आळेफाटा: केंद्रातील सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क आकारणीचा घेतलेला निर्णय हा अघोषित आहे. ही निर्यातबंदी असून यामुळे केंद्र सरकारशेतकरीवर्गाच्या मुळाशी उठल्याचे सांगत विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय दुर्दैवी असल्याचे खासदार डाॅ अमोल कोल्हे यांनी सांगितले. कांदा निर्यात शुल्काविरोधात आळेफाटा येथे आंदोलनात ते बोलत होते. त्यांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आक्रमक शेतकऱ्यांनी सुमारे तासभर रस्त्यावर या भांडत या निर्णयाची होळी केली. 

कांदा निर्यात शंका विरोधात आज आळेफाटा चौकात महाविकास आघाडी शेतकरी संघटना, शेतकरी आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. निर्यात शुल्क लादल्याचे निषेधार्थ सुमारे एक तास रस्त्यावर ठिय्या मांडत या निर्णयाची होळी केली. आळेफाटा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी पुष्पहार अर्पण करत या आंदोलनास सुरुवात झाली.

 कोल्हे यांनी सांगितले की, तीन वर्षे कांदा उत्पादक शेतकरी दराबाबत आक्रोश करत होते. मात्र सध्या दर वाढले अन सरकार त्यावर निर्यात शुल्क आकारून शेतकऱ्यांच्या मुळाशी उठले आहे. शेतीतून मालाचे भाव वाढले की ते कमी करण्याचे धोरण केंद्र सरकार अवलंबते यापेक्षा पेट्रोल डिझेल खाद्यतेल व गॅस सिलिंडर यांचे दर कमी करा. यामुळे केंद्राचे धोरण शेजारील देशातील शेतकऱ्याला फायदा करणारे आहे. पिक विमा योजना आणली मात्र याचा फायदा विमा कंपन्यांना झाला. केंद्र सरकार शेतकरी तसेच ग्राहक यांच्यामध्ये अप्रत्यक्षरीत्या लढाई करत असल्याचे त्यांनी सांगितले. कांद्याचा हमीभाव मिळाला पाहिजे.  केंद्रातील नेते जर महाराष्ट्रात आले तर त्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घालून त्यांचा स्वागत करणार. रडायचे नाही पण लढाईचे व येत्या निवडणुकीत केंद्र सरकारला तसेच राज्य सरकारला जागा दाखवून देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेonionकांदाCentral Governmentकेंद्र सरकारDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेFarmerशेतकरीPoliticsराजकारण