महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर यांना पितृशोक; लोणी काळभोर परिसरात हळहळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 15:27 IST2021-04-27T15:27:28+5:302021-04-27T15:27:54+5:30

लोणी काळभोर येथील जुन्या पिढीतील नामांकित पैलवान दादा उर्फ रामचंद्र काळभोर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

Maharashtra Kesari wrestler Rahul Kalbhor father died today in pune | महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर यांना पितृशोक; लोणी काळभोर परिसरात हळहळ

महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर यांना पितृशोक; लोणी काळभोर परिसरात हळहळ

लोणी काळभोर - येथील जुन्या पिढीतील नामांकित पैलवान दादा उर्फ रामचंद्र विठ्ठल काळभोर ( वय ७२ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, चार बहिणी, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतींचे विद्यमान सरपंच राजाराम काळभोर हे त्यांचे बंधू तर २००१ सालचे महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर हे त्यांचे चिरंजीव आहेत. 

स्वर्गीय रामचंद्र काळभोर यांचे वडीलही त्या काळचे नामांकीत पैलवान होते. त्यांचा शेती व्यवसाय असून मुलांनी कुस्ती क्षेत्रात नाव कमवावे असे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न मुलगा राहुल याने २००१ सालचा महाराष्ट्र केसरी किताब जिंकून पूर्ण केले.

धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या रामचंद्र काळभोर यांचे मन खुपच हळवे होते. रामचंद्र काळभोर यांच्या निधनाबद्दल लोणी काळभोर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Maharashtra Kesari wrestler Rahul Kalbhor father died today in pune