शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Maharashtra HSC Results 2021: यंदाच्या वर्षीही कोकणचाच बोलबाला; राज्यातील ६ हजार ५४२ विद्यालयांचा १०० टक्के निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:20 IST

Maharashtra HSC Results 2021: शंभर टक्के गुण मिळवणारे ४६ विद्यार्थी...

पुणे: दहावीनंतर बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले असून राज्य मंडळाचा २०२१ चा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात ८.९७ टक्क्यांनी वाढ झाली. त्यात विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५ टक्के, कला शाखेचा ९९.८३ टक्के , वाणिज्य शाखेचा ९९.९१ टक्के तर एमसीव्हीसीचा निकाल ९८.८० टक्के लागला. राज्यातील ४६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. नऊ विभागीय मंडळात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नऊ विभागीय मंडळांअंतर्गत घेतल्या जाणा-या बारावी परीक्षेचा निकाल राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी मंगळवारी जाहीर केला. यावेळी विभागाचे सचिव डॉ.अशोक भोसले उपस्थित होते. कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे यंदा दहावी,अकरावीचे गुण आणि बारावीतील अंतर्गत परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे बारावीचा निकाल प्रसिध्द करण्यात आला.

पाटील म्हणाले, राज्यातील १३ लाख १९ हजार ७५४ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ४ हजार ७८९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. बारावीतील मुलींचा निकाल ९९.७३ टक्के तर मुलांचा निकाल ९९.५४ टक्के लागला आहे.निकालात यंदाही मुलींचीच आघाडी आहे.तसेच एकूण १६० विषयांपैकी ७० विषयांचा निकाल १०० टक्के लागला. --------------------बारावी निकालाची वैशिष्ट्ये

  - राज्यातील ६ हजार ५४२ शाळांचा निकाल १०० टक्के - एकाही शाळेचा निकाल शून्य टक्के नाही  - १२ विद्यार्थी ३५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण  -  ९१ हजार ४२० विद्यार्थ्यांना ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण  - १ हजार ३७२ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण  - दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९९.५९ टक्के--------------------  विभागीय मंडळाचा निकाल  मंडळाचे नाव            निकालाची टक्केवारी पुणे                           ९९.७५नागपूर                      ९९.६२औरंगाबाद                 ९९.३४मुंबई                         ९९.७९कोल्हापूर                  ९९.६७अमरावती                ९९.३७नाशिक                    ९९.६१लातूर                      ९९.६५कोकण                    ९९.८१------------------------- शाखा निहाय निकालाची तुलनात्मक टक्केवारी  शाखा               २०२० चा निकाल                     २०२१ चा निकाल                   तुलनात्मक टक्केवारीविज्ञान             ९६.९३                                    ९९.४५                                   २.५२ जास्त कला                ८२.६३                                    ९९.८३                                   १७.२०जास्तवाणिज्य          ९१.२७                                     ९९.९१                                  ८.६४ जास्तएमसीव्हीसी    ८६.०७                                     ९८.८०                                   १२.७३ जास्त

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयHSC Exam Resultबारावी निकाल