शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
4
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
5
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
6
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
7
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
8
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
9
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
10
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
11
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
13
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
14
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
15
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
16
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
17
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
18
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
19
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
20
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड

महाराष्ट्राची गेली ७० वर्षात जेवढी बदनामी झाली नाही, तेवढी या दीडशे दिवसात झाली - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 18:56 IST

राज्य आर्थिक संकटात असून दररोज गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे, मंत्री वादग्रस्त विधाने करत आहेत

पुणे : गेली सत्तर वर्षात जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही, तेवढी बदनामी या दीडशे दिवसात झाली आहे. राज्य आर्थिक संकटात आहे, दररोज गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे, मंत्री वादग्रस्त विधाने करत आहेत. या सर्व गोष्टींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मित्र पक्षांवर नाराज असून त्यांनी आपली नाराजी दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घातल्याचा गौप्यस्फोट  खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. शनिवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक

पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड झाल्यानंतर शहर कार्यकारिणीमध्ये ही बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी शहरातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक झाली. यात आगामी महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड व प्रभागाची रचना कशी असेल, काय तयारी करावी लागेल, याची चर्चा करण्यात आल्याचे सुळे यांनी सांगितले.

सुळे असेही म्हणाल्या,

- माजी मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देणे चुकीचे असून आम्ही त्यांना निर्णय प्रक्रियेत घेऊ देणार नाही.- महादेव मुंडेंची हत्या व वाल्मीक कराडांना मिळणारी व्हीआयपी ट्रीटमेंट, यावर आम्ही गृहमंत्री अमित शहा यांची वेळ मागितली आहे.- शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, याबद्दल मला माहिती नाही, मात्र आम्ही महाराष्ट्र प्रेमी आहोत. विरोधकांच्या विकेट पडत आहेत म्हणून आम्हाला आनंद होत नाही, ते राज्यातल्या विषयांवर बोलण्यासाठी भेट घेत असावेत.- गेली कित्येक महिने मी हिंजवडीच्या अडचणी मांडत आहे, सरकारला उशिरा शहाणपण सुचले आहे.- हिंजवडी संदर्भातील बैठकांना बोलावले जात नाही. - हिंजवडीतील एका शाळेसमोर बार आहे, हा बार बंद झाला नाही तर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे.- पालकमंत्री अजित पवार यांनी कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी मोक्का लावण्यासोबत कोकाटेंचा निर्णय मंगळवारी घेण्याचे बोलून दाखवले आहे, ते त्यांनी करून दाखवावे.

ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणावे

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याचे उजेडात आले आहे. घाईघाईने या योजनेचे जास्तीत जास्त अर्ज भरण्यात आले. यामागे खूप मोठे षडयंत्र असून योजनेचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी असलेल्या आणि या योजनेसाठी सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या ठेकेदाराची ईडी, सीबीआय व एसआयटीमार्फत चौकशी करावी, यातील जे सत्य आहे, ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणावे, अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार