शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्र निकाल निवडणूक २०१९ : पर्वतीमध्ये माधुरी मिसाळांची ''हॅट्ट्रिक ’' : शहरातील सर्वाधिक मताधिक्य :

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 20:56 IST

Pune Election Result 2019 : राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांचा केला पराभव..

ठळक मुद्देकोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामामध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला झाली सुरुवात

पुणे : पर्वती मतदार संघामध्ये सलग तिसऱ्यांदा निवडून येत भाजपाच्या माधुरी मिसाळ यांनी अपेक्षेप्रमाणे ‘हॅटट्रिक’ साधली. तब्बल ९७ हजार १२ मते घेत राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांचा ३६ हजार ७६७ मतांनी पराभव केला. मिसाळ यांनी पुन्हा एकदा शहरातील आठही आमदारांपेक्षा सर्वाधिक मताधिक्य मिळवित आघाडी घेतली.कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामामध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीतच भाजपाने आघाडी घ्यायला सुरुवात केली होती. पहिल्या फेरीत असलेला एक हजारांचा फरक शेवटच्या २३ व्या फेरीपर्यंत ३६ हजार ७६७ वर गेला. परंतू, राष्ट्रवादीच्या कदम यांनी दहाव्या फेरीपर्यंत मिसाळ यांच्या बरोबरीने मते घेत फार फरक पडू दिला नव्हता. सातव्या फेरीत कदम यांनी मिसाळांपेक्षा ३०० मते अधिक घेतली होती. परंतू, नंतरच्या सर्वच फेºयांमध्ये मिसाळांची आघाडी वाढत गेली. दोन्ही उमेदवारांमधील मतांची दरी वाढत गेली. प्रत्येक फेरी गणिक वाढत जाणारी धाकधूक आणि उत्सुकता सर्वांच्याच चेहºयावर जाणवत होती. मिसाळ या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल ६९ हजार मतांनी निवडून आल्या होत्या. हे मताधिक्य यंदा कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने तसेच आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे नागरिकांची ओढवलेली नाराजी यामुळे हे मताधिक्य टिकवण्यात कितपत यश येते याकडे लक्ष लागलेले होते. तेराव्या फेरीपर्यंत मिसाळ यांचे मताधिक्य पंचवीस हजारांपेक्षा अधिक राहू शकेल का अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतू, त्यानंतर कदम मागे पडत गेल्या आणि मिसाळ यांनी एकदम आघाडी घेण्यास सुरुवात केली. चौदाव्या फेरीनंतर २५ हजारांचे मताधिक्य ओलांडल्यावर राष्ट्रवादीच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. शेवटच्या फेरीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी भानूदास गायकवाड यांनी मिसाळ यांना विजयी घोषित करीत विजयाचे प्रमाणपत्र दिले. मिसाळ यांना मिळालेले मताधिक्य हे शहरातील सर्वच विजयी उमेदवारांपेक्षा अधिक असले तरी २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत हे मताधिक्य ३२ हजार ३२३ ने घटले. पर्वती मतदार संघातील भाजपाच्या पारंपरिक मतदारांसोबतच मिसाळ यांचा स्वत:चा म्हणून असलेला मतदार भाजपाच्या पडझडीमध्येही पाठीशी राहिला. त्यामुळे पुन्हा एकदा मिसाळांनी पर्वती  ‘सर’ केली. ====वंचित बहुजन आघाडीचा ‘फॅक्टर’ पर्वती मतदार संघात चाललाच नसल्याचे स्पष्ट झाले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॠषीकेश नांगरे पाटील यांना ७ हजार ७७४ मते पडली. तर ३ हजार ६६८ मतदारांंनी नोटाला पसंती दिली. रविंद्र क्षिरसागर (बीएसपी) यांना १३९१, शतायू भगळे (बमुपा) १३०९, संदीप सोनवणे (आप) ६४५ यांच्यासह अपक्ष उमेदवार अरविंद क रमरकर (२५०), निखील शिंदे १६४, परमेश्वर जाधव २५०, राहूल खुडे ८९९, रोहित अशोक २२५ अशी मते मिळाली. ====प्रमुख उमेदवारांची मतेमाधुरी मिसाळ (भाजपा)        : 97, 012अश्विनी कदम (राष्ट्रवादी)    : 60, 245फरक                : 36,767

टॅग्स :Puneपुणेparvati-acपर्वतीmadhuri misalमाधुरी मिसाळMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेस