शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : हडपसर विधानसभेत मतदानाचा टक्का घसरला; ५०.१६ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 07:00 IST

Hadapsar Election 2019 : हडपसर विधानसभा मतदार संघात मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला व केवळ ५०.१६ टक्केच मतदान झाले.

ठळक मुद्दे मॉकपोल आणि नंतर मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही ठिकाणी मतदान यंत्र पडले बंद

पुणे : हडपसर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत असून ही प्रचारामध्ये फारशी रंगत न आल्याने, उमेदवारांना प्रचारांसाठी मिळालेला कमी कालावधी, मतदानावर असलेले पावसाचे सावट यामुळे प्रशासकीय यंत्रणेने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करुन देखील मतदानासाठी मतदार घराबाहेर पडला नाही. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला असून, हडपसर विधानसभा मतदार संघात मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला व केवळ ५०.१६ टक्केच मतदान झाले. मॉकपोल आणि नंतर मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना वगळता मतदार संघात अत्यंत शांततेत मतदान पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.      रविवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या धुवाधार पावसामुळे पत्राशेड मतदान केंद्रांमध्ये आलेल्या प्रचंड अडचणी, शाळांच्या मैदानांवर झालेला प्रचंड चिखल आणि सोमवारी (दि.२१) मतदानाच्या दिवशी देखील असलेले पावसाचे सावट यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे मोठे आवाहन निवडणूक प्रशासनासमोर होते. तर पाऊस पडल्यास मतदार घराबाहेर पडणार का या चिंतेत उमेदवार होते. परंतु मतदानाच्या दिवशी संपूर्ण दिवस पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. मतदार संघात सकाळाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर आयटी क्षेत्रातील, सुशिक्षित मतदारांनी रांगा लावून मतदान केले. सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये असलेला उत्सहा दुपारनंतर काही प्रमाणात कमी झाला. सायंकाळी काही ठरावीक मतदान केंद्र वगळता बहुतेक सर्व ठिकाणी तुरळक गर्दी होती. पहाटे साडेपाच वाजता मॉकपोल सुरु झाल्यानंतर अनेक ठिकाणी मशिन बंद पडल्या असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने दहा ते पंधरा मिनिटीता मशिन बदली करुन देण्यात आल्या. सकाळी ७ ते ९ यावेळेत ७.८३ टक्के मतदान झाले. त्यानंतर अनेक मतदान केंद्रांवर गर्दी होण्यास सुरुवात झाली. सकाळी ११ पर्यंत १२.७१ टक्के मतदान झाले. दुपारी १ पर्यंत मतदानाचा टक्का २९.१६ टक्के मतदान झाले. दुपार नंतर मात्र अनेक मतदान केंद्रांवक अत्यंत तुरळकपणे मतदार मतदान करताना दिसत होते. दुपारी १ ते ४ या कालावधीत मतदानाची टक्केवारी चांगलीच घसरली. त्यानंतर सायंकाळच्या वेळेत पुन्हा काही प्रमाणात गर्दीला सुरुवात झाली. सायंकाळी ५ पर्यंत हडपसर मतदार संघात ४८.८४ टक्के मतदान झाले. मतदानासाठी सायंकाळी ६ पर्यंतची वेळ असल्याने अखेरच्या एक तासामध्ये मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नाही. यामुळेच हडपसरमध्ये सरासरी ५०.१६ टक्के मतदान झाले. --------------------------पावसामुळे मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रमाण वाढलेनिवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पहाटे साडे पाच वाजता सर्व मतदान केंद्रांवर मॉकपोल सुरु करण्यात आले. परंतु रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे अनेक मतदान यंत्रांमध्ये मॉईश्र्चर  झाल्याने मॉकपोलच्या वेळीच अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे यंत्रातील व्हीव्हीपॅटला मोठ्या प्रमाणात मॉईश्र्चर जमा झाल्याने प्रथमच मोठ्या प्रमाणात मशिन बंद पडत आहेत. हे हाय रिक्स म्हणजे २ टक्क्यांपेक्षा अधिक होते. व्हीव्हीपॅट मध्ये असलेले सेन्सॉर अत्यंत संवेदनशील असते. यामुळे ढगाळ वातावरण आणि अति उष्ण वातावरणाचा देखील मशिन बंद पडू शकतात.- निरजकुमार झा, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी----------------------हडपसर विधानसभा मतदार संघातील २०१४ चे मतदान- एकूण मतदार : ४ लाख १६ हजार ८४०- झालेल्या मतदानाची टक्केवारी : ५२.३६ टक्के- एकूण झालेले मतदान : २ लाख १८ हजार २४०- पुरुष मतदार : १ लाख १९ हजार ८८५- महिला मतदार : ९७ हजार ८१९- इतर मतदार : ०१----------------------------हडपसर विधानसभा मतदार संघात लोकसभा २०१९ चे मतदानएकूण मतदार :एकूण झालेल्या मतदानाची टक्केवारी :एकूण झालेले मतदान : पुरुष मतदार :महिला मतदार : इतर मतदार : -----------------------हडपसर विधानसभा मतदार संघात असे झाले मतदानसकाळी ७ ते ९ : ७.८३ टक्केसकाळी ०९ ते ११ : १२.७१ टक्केसकाळी ११ ते ०१ : २९.१६ टक्केदुपारी ०१ ते ०३ : ४१.१६ टक्केसायंकाळी ०३ ते ०५ : ४८.८४ टक्केअंतिम टक्के वारी : ५०.१६

टॅग्स :Puneपुणेhadapsar-acहडपसरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान