Maharashtra Election 2019: यंदा आमचंच सरकार येईल- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 09:15 IST2019-10-21T09:14:36+5:302019-10-21T09:15:12+5:30
Maharashtra Election 2019: बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबीयांसह मतदान केले.

Maharashtra Election 2019: यंदा आमचंच सरकार येईल- सुप्रिया सुळे
पुणे : बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबीयांसह मतदान केले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आज सुळे यांनी त्यांच्या आई प्रतिभा पवार आणि कुटुंबीयांसह मतदान केले. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या की, आज बारामतीत आम्ही सगळे मतदानासाठी आलो आहोत. राष्ट्रवादीने कायम विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली आहेत. त्यामुळे मला विजयाची खात्री आहे. ईडीच्या कारवाईचा कोणताही परिणाम झालेला नाही. भाजपाचे दिग्गज मंत्री आणि पदाधिकारी प्रचारासाठी आले यावरून कोणाचे पारडे जड आहे हे लक्षात आले असेलच. यावेळी त्यांनी पावसाची तमा न बाळगता लोकांनी मतदान करावे, असे आवाहन केले. बारामतीतून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासमोर भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांचे आव्हान आहे.