शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Maharashtra Election 2019 : राहुल कुल यांच्यावर टीका करण्याची कुणाची लायकी नाही : सुरेश शेळके 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 2:10 PM

राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणुकीच्या तोंडावर राजकीय लाभ घेण्यासाठी भीमा पाटस कारखान्याचा कळवळा असल्याचा आव आणत आहे....

ठळक मुद्दे विधानसभेच्या प्रचारात भीमा पाटस कारखान्याच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार टीकासुरेश शेळके यांनी यवत येथे पत्रकारांशी संवाद साधत थोरात यांच्यावर ओढले चांगलेच ताशेरे

यवत :- शेतकऱ्यांच्या मालकीचा भीमा सहकारी साखर कारखाना बंद पाडून खासगी मालकीचा होऊ दिला नाही म्हणून आमदार राहुल कुल यांना अडचणीत आणणाऱ्या मंडळींना सर्वोतोपरी सहकार्य रमेश थोरात यांनी केले. त्यामुळे भीमा पाटसवर बोलायची त्यांची लायकीच नाही अशी जोरदार टीका भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक सुरेश शेळके यांनी केली आहे.         विधानसभेच्या प्रचारात भीमा पाटस कारखान्याच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीकडून जोरदार टीका केली जात असल्याने कारखान्यात मागील अनेक वर्षात संचालक म्हणून काम केलेले आणि कुल घराण्याचे निष्ठावान कार्यकर्ते सुरेश शेळके यांनी राष्ट्रवादी आणि रमेश थोरात यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. सुरेश शेळके यांनी यवत येथे पत्रकारांशी संवाद साधत थोरात यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले. ज्या थोरात यांना भीमा पाटस कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी घरी बसविले, त्यांच्या भागातून निवडून जाणारा मी संचालक आहे.आमच्यात थेट लढत त्या निवडणुकीत झाली होती.आता रमेश थोरात यांना कारखान्याची निवडणूक लढविण्याची तल्लफ देखील होत नाही. शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेला भीमा पाटस कसा बंद पडेल यासाठी कायम प्रयत्नशील असणारे रमेश थोरात.. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय लाभ घेण्यासाठी भीमा पाटस कारखान्याचा कळवळा आल्याचा आव आणतात. मात्र यांना यांची जागा सभासदांनी दाखविलेली असल्याने त्यांनी आता तालुक्याच्या विकास कामांवर बोलावे असे आवाहन शेळके यांनी केले.           भीमा पाटस कारखाण्यावर कर्जाचा डोंगर झाल्याचे सांगणारे रमेश थोरात यांचे आयुष्य लाचारी करण्यात गेले आहे. आमदार राहुल कुल यांनी स्वाभिमानीपणा जपत अडचणीत असला तरी भीमा पाटस कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच ठेवला आहे.त्यात त्यांचा स्वार्थ काय ? दौंड तालुक्यात कधी नव्हता मिळाला एवढा विकास निधी मागील पाच वर्षात आला आहे.अनेकांना वैयक्तिक शासकीय योजनांचा थेट लाभ राहुल कुल यांच्या माध्यमातून मिळाला.मात्र, जनतेची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी पटाईत असलेल्या लबाड प्रवृत्तीच्या मंडळींना तालुक्यातील सुज्ञ जनता जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असेही सुरेश शेळके यांनी सांगितले.

.................दौंड तालुका तांबोळी समाजाच्या वतीने राहुल कुल यांना जाहीर पाठींबा        पुणे जिल्हा युवक काँग्रेस पक्षाचे मा.जिल्हा सरचिटणीस व अंजुमन इत्तेहाद  दौंड तालुका तांबोळी समाज संघटनेचे तालुका अध्यख मोहसीन तांबोळी यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला असून दौंड तालुका तांबोळी समाज यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांना जाहीर पाठींबा दिला आहे.तांबोळी समाज संघटना मुस्लिम समाजातील इतर मागास वर्गात येणाऱ्या नागरिकांसाठी काम करते.कुल यांनी आमदार असताना मुस्लिम समाजासाठी अनेक विकास कामे केल्याने त्यांना जाहीर पाठींबा देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :daund-acदौंडElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण