शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : इंदापूर, बारामतीसह सर्वत्र उत्साहात मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 14:10 IST

Pune Election 2019 : इंदापूर तालुक्यात तरुणांची गर्दी उल्लेखनीय..

ठळक मुद्देसंध्याकाळी उशिरापर्यंत रांगा पावसाने विश्रांती घेतल्याने मतदानाचा वेग वाढला

कळस : कळस व परिसरात ८० टक्के मतदान पार पडले. इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठी कोणताही अनुचित प्रकार न  घडता शांततेत मतदान झाले. येथील जिल्हा कळस येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली पाटील यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला.कळस  व परिसरातील बिरंगुडी, बागवाडी, पिलेवाडी, गोसावीवाडी मध्ये एकून ५७१० मतदार होते. त्यामधील सुमारे ४५६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कळस एकूण मतदान २९८६ झालेले मतदान २१६९, बिरंगुडी एकूण मतदान ६११ झालेले मतदान ५२४, बागवाडी  एकूण मतदान ४४०   झालेले मतदान ३६२,गोसाविवाडी एकूण मतदान ८३६झालेले मतदान ७५६, पिलेवाडी एकूण मतदान ८३८ झालेले मतदान ७३८ असे मतदान झाले आहे दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी होती दुपारनंतर मतदान चांगले झाले कोणताही अनुचित प्रकार न घडता  शांततेत मतदान झाले. बोरी गावामध्ये एकूण ४७२७ मतदार होते यामध्ये ३७८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला येथे सुमारे ८० टक्के मतदान झाले आहे.जंक्शन आनंदनगर ४७१० मतदार होते. यामध्ये २७६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  येथे ५८ टक्के मतदान झाले आहे. कळंब गावात एकुण मतदान ६१३० होते यापैकी ४४८५ मतदान झाले आहे .७३.१६ टक्के आहे. अंथुर्णे गावात एकुण मतदान ४४३५ यापैकी ३५३९ याठिकाणी ८० टक्के मतदान झाले आहे. भरणेवाडी गावात ३४४५ मतदान यापैकी २९०० याठिकाणी ८४ टक्के मतदान झाले आहे. भादलवाडी गावात एकुण १७२६ मतदान होते.यापैकी ११०७ मतदारांनी म्हणजेच ६४ टक्के मतदान केले. जास्तीत जास्त मतदान आपल्याला घडून यावे ,यासाठीचे प्रयत्न शेवटच्या क्षणांपर्यंत सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत होते..........कळस व परिसरात शांततेत८० टक्के मतदानहर्षवर्धन पाटील यांचे बावड्यात मतदानबारामती : भाजप महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी बावडा गावात मतदान केले. सकाळी दहा वाजता भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी पत्नी भाग्यश्री, मुलगी जि.प.सदस्या अंकिता पाटील, पुत्र राजवर्धन, बंधू सरपंच किरण पाटील, उदयसिंह पाटील यांच्यासमवेत येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला . ........अकोलेमध्ये गर्दीमुळे काही काळ गोंधळ  अकोले : अकोले (ता.इंदापूर) मध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. सकाळी पावसाच्या वातावरणामुळे गर्दी कमी होती. मात्र दुपारी एकनंतर लोकांनी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मोठ्या गर्दीमुळे काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. दुपारी तीननंतर शांततेत मतदान केले. मतदानासाठी महिलांची संख्या जास्त होती. पाच वाजलेपासून पुन्हा गर्दी होऊ लागल्याने संध्याकाळी सहा वाजून गेल्यानंतरही मतदान सुरूच होते. वायसेवाडी,धायगुडेवाडी या ठिकाणी मतदान शांततेत सुरु होते........कळंब गावात ७३.१६ टक्के कळंब : इंदापूर तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कळंब गावात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले. एकूण ६ बूथवर ७३.१६ टक्के मतदान झाले असल्याची माहिती झोनल अधिकारी व्ही. आर. बोधे यांनी दिली.......४कळंब गावठाण भागासह भोरकरवाडी, लक्ष्मीनगर, इंदिरानगर, मल्हारनगर आदी भागातील मतदान ३ बूथवर  प्राथमिक शाळेमध्ये झाले. लालपुरी येथे ३ बूथवर जानकरमळा, लालपुरी, फडतरेवस्ती, मोहितेमळा,जमदाडेवस्ती आदी भागातून मतदान झाले. .....४मतदान केंद्रावर वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी शांतता प्रस्थापित करण्याच्या नादात मतदारांना दमबाजी केल्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर होता.

टॅग्स :Puneपुणेindapur-acइंदापूरbaramati-acबारामतीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019