Maharashtra election 2019 : ' पर्वती' मध्ये राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 08:09 PM2019-10-03T20:09:26+5:302019-10-03T20:10:27+5:30

गेल्या 30 वर्षांपासून आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत नाराज काँग्रेस नगरसेवकाकडून बंडाचे निशाण..

Maharashtra election 2019 : headache increasing dQ ncp in the 'Parvati' | Maharashtra election 2019 : ' पर्वती' मध्ये राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे

Maharashtra election 2019 : ' पर्वती' मध्ये राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे

Next
ठळक मुद्देजाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप

पुणे : काँग्रेस पक्षाकडे परंपरागत असलेला पर्वती मतदार संघ या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीकडे देण्यात आल्याने काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरलेली असतानाच आता ज्येष्ठ  नगरसेवक आबा बागूल यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. बागूल शुक्रवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे. 
पर्वती मतदार संघामध्ये तब्बल वीस वर्ष काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत. काँग्रेसचे वसंत चव्हाण एकदा, शरद रणपिसे दोन वेळा आणि रमेश बागवे एकदा असे चार आमदार पर्वतीने काँग्रेसला दिले. मतदार संघामध्ये काँग्रेसचा परंपरागत मतदारही आहे. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून अभय छाजेड आणि राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप यांनी निवडणूक लढविली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे. आघाडीच्या जागा वाटपामध्ये पर्वती मतदार संघ राष्ट्रवादीला सोडण्यात आला आहे. 
पर्वतीसाठी काँग्रेसकडून आबा बागूल यांनी मुलाखतही दिली होती. बागूल हे अनेक वर्षांपासून उमेदवारी मागत आहेत. परंतू, मतदार संघ राष्ट्रवादीला गेल्याने बागूल नाराज झाले आहेत. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पर्वती पुन्हा काँग्रेसकडे घेण्याबाबतही प्रयत्न केले. परंतू, त्यामध्ये यश आले नाही. आता बागूल यांनी उघड नाराजी व्यक्त करीत अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याचे सांगितले. सकाळी नऊ वाजता कार्यकर्ते व नागरिकांची बैठक घेऊन दुपारी बारापर्यंत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून आपल्यावर अन्याय होत असून आता मी माझ्या क्षमता आणि अस्तित्व दाखवून देणार असल्याचे बागूल यांनी सांगितले. 
राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेल्या नगरसेविका अश्विनी कदम आणि बागूल एकाच प्रभागातील नगरसेवक आहेत. बागूल खरेच अपक्ष उमेदवारी दाखल करतात की पुन्हा आपला आक्रमक पवित्रा मागे घेतात याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Maharashtra election 2019 : headache increasing dQ ncp in the 'Parvati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.