शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

Maharashtra Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट - वडगावशेरीत दुहेरी लढतीची पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 11:57 IST

एमआयएमचे उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किती मते घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार

- राहुल शिंदे 

वडगावशेरी मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्यातच दुहेरी लढत होईल, अशी सध्याची स्थिती आहे. परंतु, एमआयएमचे उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किती मते घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यातच शिवसेनेचे पदाधिकारी युतीधर्म कितपत पाळतात यावर वडगावशेरीतील आमदाराचे भवितव्य ठरणार आहे. सध्या तरी वडगावशेरी मतदारसंघात दुहेरी व अटीतटीची  निवडणूक होईल, असेच चित्र आहे. वडगावशेरी मतदारसंघातून भाजपचे आमदार जगदीश मुळीक ५ हजार ३२५ मतांनी विजयी झाले होते. मुळीक यांना ६६ हजार ९०८ तर शिवसेनेकडून निवडणूक लढविणाऱ्यासुनील टिंगरे यांना ६१ हजार ५८३ मते मिळाली होती. तर नुकतेचे भाजपमध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे यांना ४४ हजार ४८० मते मिळाली होती. टिंगरे यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करूनही त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यात सध्या शिवसेनेला पुणे शहरात एकही जागा न दिल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजीचे वातावरण आहे . शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक संजय भोसले हे वडगवाशेरीतून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. तिकीट न मिळाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी  भाजपच्या विरोधात काम करण्याची भूमिका घेतली होती. परंतु, सध्या काही कार्यकर्ते भाजपच्या प्रचारात दिसत असले तरी अनेक जण दुखावले गेले आहेत. त्याचा फटका भाजपला बसू शकतो. मात्र, मनसेने उघडपणे सुनील टिंगरे यांना पाठिंबा दिला आहे. सध्या टिंगरे व मुळीक या दोघांचाही जोरदार प्रचार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व जयंत पाटील यांनी वडगावशेरीतून रॅली काढली. तर पुण्याचे खासदार गिरीश बापट व संजय काकडे यांनी मुळीक यांच्या प्रचारासाठी वेळ दिला. उद्या शुक्रवारी चंदननगर येथे खासदार अमोल कोल्हे यांची सभा आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे. गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे भाजपचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.  .........पठारेंच्या प्रवेशाने मुळीक यांना फायदा ?४भाजपवर टीका करणारे बापू पठारे यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीला वडगावशेरीत खिंडार पडले असे बोलले जात आहे. परंतु, नेते गेले म्हणून सर्व कार्यकर्ते त्यांच्या मागे जातील, असे गृहीत धरता येत  नाही. मात्र, वडगावशेरीच्या विजयाला अडचणीचे ठरणारे बापू पठारे भाजपमध्ये आल्यामुळे मुळीक यांची आमदारकी सोपी झाली किंवा नाही हे मतदानाच्या दिवशीच स्पष्ट होईल. 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकPoliticsराजकारणvadgaon-sheri-acवडगाव शेरीjagdish mulikजगदीश मुळीकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस