शहरं
Join us  
Trending Stories
1
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
2
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
5
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
6
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
7
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
8
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
9
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
10
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
11
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
12
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
13
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
14
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
15
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
16
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
17
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
18
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
19
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्याची गाडी पेटवली; पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 19:19 IST

पिपंरी चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला केला आहे.

Chinchwad Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीला केवळ १५ दिवस उरले आहेत. उमेदवारांनीही आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. दुसरीकडे पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. एका अपक्ष उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्याची गाडी पेटवून दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपक्ष उमेदवाराला ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. दृष्टिहीन उमेदवार विनायक ओव्हाळ यांनी शासकीय कार्यालयात विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. काळेवाडी पोलिसांनी याप्रकरणी विनायक ओव्हाळ यांना ताब्यात घेतलं आहे.  वेळीच आग नियंत्रणात आणण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.पोलिसांनी ही आग आटोक्यात आणली.

या घटनेत निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. ओव्हाळ यांनी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न का केला, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. उमेदवारी अर्जाबाबत दोघांमध्ये काही वाद झाला होता का, याबाबत पिंपरी चिंचवडमध्ये चर्चा सुरू आहे. वारंवार पाठपुरावा करून ही रमाई आवास योजनेत घर मिळालं नाही, रसवंती आणि फटाका स्टॉल लावण्यास परवानगी दिली नाही. तसेच पालिकेच्या थेरगाव रुग्णालयात कॅन्टीनला लावण्याची परवानगी दिली नाही, यामुळं ओव्हाळ यांनी गाडी पेटवून दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेत विनायक ओव्हाळ यांच्यासोबत नागेश काळे आणि अजय गायकवाड हे आणखी दोघे उपस्थित होते. काळे सुद्धा दिव्यांग असून त्यांच्याच रिक्षातून ओव्हाळ हे ग प्रभागात आले होते. त्याचवेळी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला.

दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या  दिवशी अपक्ष नाना काटे यांच्यासह फक्त सात उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता महायुतीचे शंकर जगताप, महाविकास आघाडीचे राहुल कलाटे आणि अपक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024chinchwad-acचिंचवडElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग