शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Maharahshtra CM : आज एकादशी आहे , आणि मी माझ्या पांडुरंगाला भेटायला चाललो: अतुल बेनके

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 17:05 IST

अजित पवार यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा , आजमितीला पक्षामध्ये फूट पडणे हे पक्षाच्या हिताचे नाही..

नारायणगाव ; आज एकादशी आहे , आणि आज मी माझ्या पांडुरंगाला भेटायला चाललो आहे , अर्थात माझे पांडुरंग हे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत , मी त्यांच्यासोबतच राहील . तथापि, अजित पवार यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा , आजमितीला पक्षामध्ये फूट पडणे हे पक्षाच्या हिताचे नाही . विधानसभा निवडणुकीत प्रतिकुल परिस्थिती असताना सर्वांनी एकत्रित येऊन जो लढा दिला आणि त्या लढ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे . त्यामुळे शरदचंद्रजी पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार अशी प्रतिक्रिया आमदार अतुल बेनके यांनी दिली .          दरम्यान , काँग्रेस ( आय ) पक्षातुन शरद पवार हे बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली , त्यावेळी आ. अतुल बेनके यांचे वडील व  तत्कालीन आमदार वल्लभ बेनके हे त्यावेळी शरद पवार यांच्या बरोबर राहिले  होते . शरद पवार यांचे कट्टर व विश्वासू समर्थक म्हणून वल्लभ बेनके यांचेकडे पाहिले जात होते , 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय झालेले अतुल बेनके हे देखील शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहणार हे त्याचे वक्तव्यातुन स्पष्ट झाले आहे .

 वळसे पाटील शरद पवारांसोबत ...  राष्टवादी काँग्रेस राज्यातील प्रमुख नेते व आंबेगाव विधानसभेचे आमदार दिलीप वळसे पाटील हे राष्टवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत आहेत. अजित पवार यांचा शपथविधी झाल्या पासून शरद पवार यांच्या प्रत्येक बैठकीला व सोबत वळसे पाटील हजर आहेत.  वळसे पाटीलांच्या राजकारणाची सुरवात शरद पवार यांच्यापासून झाली व तेव्हा पासून ते  शरद पवारांशी एकनिष्ट आहेत. शरद पवार यांची साथ कधीच सोडू शकणार नाही, असे त्यांनी अनेकवेळा स्पष्ट केले आहे व त्याची प्रचीती देखील आज आली. अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आली सकाळ पासून वळसे पाटील शरद पवार यांच्या सोबत आहेत. या धावपळीत वळसे पाटील यांच्याशी संपर्क झाला नसला तरी तालुक्यातील त्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, शरद पवार यांची साथ सोडण्याचा विचार सुध्दा आमच्या मनात येणार नाही, असे ठाम पणे सांगत होते. 

टॅग्स :narayangaonनारायणगावChief Ministerमुख्यमंत्रीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार