Mahahrashtra Election 2019 : हडपसरला विकासापासून वंचित ठेवत काँग्रेसवाल्यांनी केली फक्त घराणी मोठी : योगेश टिळेकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 01:02 PM2019-10-12T13:02:38+5:302019-10-12T13:12:20+5:30

५०-५० वर्षांपासून या काँग्रेसवाल्यांनी प्रगतीपासून हडपसरला वंचित ठेवले होते

Mahahrashtra Election 2019 : Deprived of development; Only the family has grown up by congress : Yogesh Tilekar | Mahahrashtra Election 2019 : हडपसरला विकासापासून वंचित ठेवत काँग्रेसवाल्यांनी केली फक्त घराणी मोठी : योगेश टिळेकर 

Mahahrashtra Election 2019 : हडपसरला विकासापासून वंचित ठेवत काँग्रेसवाल्यांनी केली फक्त घराणी मोठी : योगेश टिळेकर 

googlenewsNext
ठळक मुद्देससाणे लॉन्समध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश

हडपसर : ५०-५० वर्षांपासून या काँग्रेसवाल्यांनी प्रगतीपासून हडपसरला वंचित ठेवले होते. त्यांची घराणी मोठी झाली. त्या व्यक्ती मोठ्या झाल्या, श्रीमंत झाल्या. पण सामान्य माणूस गरीब तो गरीबच राहिला, अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी करीत योगेश टिळेकर केलेल्या विकासकामातून जनतेला न्याय दिला असल्याचे सांगितले.
येथील महंमदवाडी येथील  ससाणे लॉन्समध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित हजारो कार्यकर्त्यांसह माजी नगरसेविका विजया वाडकर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी बापट बोलत होते.  
याप्रसंगी पुण्याचे खासदार गिरीश बापट, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, आरपीआयच्या महिला आघाडी अध्यक्ष शशिकला वाघमारे, शिवसेनेच्या नगरसेविका संगीता ठोसर, आरपीआयच्या संगीता आठवले, शिवसेना हडपसर प्रमुख तानाजी लोणकर, भाजपा ओबीसी आघाडी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विकास रासकर, नगरसेवक मारुती तुपे, शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे, कार्यक्षम नगरसेवक संजय घुले, नगरसेविका प्राची आल्हाट, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका रंजना टिळेकर, वृषाली कामठे, वीरसेन जगताप, मनीषा कदम, शिवसेना युवा नेते राजेंद्र बाबर, आरपीआयचे संतोष खरात, शिवसेना विभाग प्रमुख योगेश कांबळे, हिंदवी स्वराज्य संघटना अध्यक्ष अभी बोराटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष भूषण तुपे, जिल्हा परिषद सदस्य वंदना कोद्रे, जिल्हा परिषद सदस्य जितूशेठ भंडारी, निवडणूक समन्वयक रवी तुपे, युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विराज तुपे,  संदीप दळवी, संजय सातव, शिवसेना ज्येष्ठ नेते अप्पासाहेब गायकवाड, सरपंच शिवराज घुले, उपसरपंच पुरुषोत्तम धारवाडकर, महायुतीचे  सर्व पदाधिकारी महिला आदी उपस्थित होते.
अनेक योजना आणून पुणे शहर आणि हडपसरमध्ये विकासाची गंगा आणण्याचे काम टिळेकर यांच्या माध्यमातून झाली आहेत. विकासकामासाठी निधी आणण्यासाठी सक्षम उमेदवार निवडून दिला पाहिजे, असे सांगून बापट यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. 

Web Title: Mahahrashtra Election 2019 : Deprived of development; Only the family has grown up by congress : Yogesh Tilekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.